BJP : सत्ताधारी आमदारांवर पैशाची बरसात, तर विरोधी आमदारांची कोंडी...

MLAs : पुरवणी मागण्यात सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघांना झुकते माप दिल्याचे चित्र आहे.
Tekchand Sawarkar, Sameer Meghe and Ashish Jaiswal
Tekchand Sawarkar, Sameer Meghe and Ashish JaiswalSarkarnama

Devendra Fadnavis has an Finance Department : राज्यात सत्ता बदलाचे परिणाम दिसू लागले असून भाजप (BJP) आमदारांच्या मतदारसंघात पैशाचा ओघ वाढू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यात सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघांना झुकते माप दिल्याचे चित्र आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त तीनच विधानसभा मतदारसंघाला निधी देण्यात आला. यात दोन मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघात शिंदे (Eknath Shinde) गटाचा आमदार आहे. राज्यात आता शिंदे सेना आणि भाजपचे सरकार आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे अर्थ खाते आहे. ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून भाजप आमदारांच्या मतदारसंघात कमी निधी दिल्याची ओरड होती.

सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्याला स्थगिती दिली होती. आता चालू वर्षांतील खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र अद्यापही मागील आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीवरचे बंधन हटवण्यात आले नाही. त्यामुळे अन्याय झालेल्या जिल्ह्यांना नव्याने निधी देण्यात येणार असल्याचे समजते. हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कामठी, हिंगणा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाला सरासरी कोट्यवधींच्या निधीची कामे मंजूर करण्यात आली. परंतु इतर मतदारसंघांत एकाही कामासाठी निधी देण्यात आल्या नसल्याची माहिती आहे. मात्र हिंगणा विधानसभेचे आमदार समीर मेघे आणि कामठी टेकचंद सावरकर हे दोन्ही भाजपचे आमदार आहेत. तर रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल आहेत. ते शिंदे गटाचे आहेत. उर्वरित इतर पक्षांच्या आमदारांना निधी देण्यात सरकारने हात आखडता घेतल्याचे दिसते.

Tekchand Sawarkar, Sameer Meghe and Ashish Jaiswal
Eknath Shinde News: सीमावादावर ठराव मांडणारे एकनाथ शिंदे हे तिसरे मुख्यमंत्री, कोणते मुद्दे मांडणार?

नागपुरात जी स्थिती आहे, अशीच स्थिती राज्यभरात असल्याची चर्चा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल परिसरात होती. हे धोरण राबवून सरकार विरोधी पक्षातील आमदारांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सरकारची ही रणनीती असल्याचेही सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com