Monsoon Session 2023 : भाई, तुम्हाला काय झाले आज? दरेकर तुम्ही अरे-कारे करू नका : खारघर प्रश्‍नावर अभूतपूर्व गोंधळ !

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार उत्तर देत असताना भाई जगताप मध्ये बोलले.
Bhai Jagtap, Pravin Darekar, Neelam Gorhe and Sudhir Mungantiwar
Bhai Jagtap, Pravin Darekar, Neelam Gorhe and Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : खारघरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात १३ सेवकांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात आज भाई जगताप यांनी विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित केला. त्याला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उत्तर देत असताना भाई जगताप मध्ये बोलले. त्यानंतर प्रवीण दरेकरांचा पारा चढला आणि ते जगतापांवर मोठ्याने ओरडले. पाहता पाहता दोघेही एकमेकांना अरे-कारे करायला लागले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोघांनाही समज दिली. (Praveen Darekar's temper rose and he shouted loudly at Jagtap)

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी खारघरमध्ये हृदयद्रावक घटना घडली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा देशात, राज्यात आणि समाजात वेगळा आदर आहे. त्यांना दिलेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमात घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात दिलेल्या उत्तरामध्ये सांगण्यात आले की, घटना नैसर्गिक आहे. त्या दिवशी तापमान ४२ अंश सेल्सिअस होते. हे सांगितले गेले होते, असे भाई जगताप बोलत असताना पुन्हा गोंधळ सुरू झाला.

या गोंधळात भाई जगताप संतापले आणि ‘तुमच्या मुळावर येणार आहे हा प्रश्‍न. सत्तेचा माज जास्त काळ चालत नाही. देशाचा आणि राज्याचा हजारो वर्षाचा इतिहास आहे की, सत्तेचा माज फार काळ चालत नाही.’, असे त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. ती संवेदनशील घटना आहे. घटना घडली त्यावेळी . आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी केली होती. चौकशी अद्यापही झाली नाही.

जे सेवक मरण पावले, त्यांच्या घरी शासनाचा प्रतिनिधी गेला नाही. घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याचे जे आश्वासन सरकारने दिले होते, ते पाळले नाही. त्या कार्यक्रमात आमदार, खासदार वातानुकूलित व्यवस्थेत बसले होते अन् लाखो श्री सेवक उन्हात भरडून गेले होते. मतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमावर ३३ कोटी रुपये खर्च झाले होते. ज्याला कंत्राट दिले होते, त्याची माहितीही भाई जगताप यांनी मागितली.

Bhai Jagtap, Pravin Darekar, Neelam Gorhe and Sudhir Mungantiwar
Monsoon Session 2023 : सभागृहात आज ‘या’साठी निघाली विलासराव देशमुखांची आठवण!

जगतापांच्या (Bhai Jagtap) प्रश्‍नाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) उत्तर देत असताना पुन्हा गोंधळ उडाला. भाई जगताप मध्ये बोलले. त्यावर प्रवीण दरेकर मोठ्याने ओरडले. त्यांच्याच इतका वाद पेटला की दोघेही अरे-तुरे करायला लागले. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हेंनी (Neelam Gorhe) परिस्थिती सांभाळली. भाई जगताप आणि प्रवीण दरेकर या दोघांनाही त्यांनी तंबी दिली. त्यानंतर कुठे वातावरण शांत झाले आणि सभागृहाचे कामकाज पुढे सुरू झाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com