Suresh Dhas In Monsoon Session: गाडी नसली तर टॅक्सी करून येतो; आम्ही पागल आहोत काय, सुरेश धस भडकले !

Pavsali Adhiveshan 2023: सभागृहात आम्ही काय गोट्या खेळायला येतो का?
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधान परिषदेत कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने आमदार सुरेश धस चांगलेच संतापले. हे सर्वोच्च सभागृह आहे आणि येथे मंत्री उपस्थित नाही की अधिकारी नाही, असे म्हणत त्यांनी तालिका सभापतींना चांगलेच सुनावले. (Neither minister nor official is present here)

सभागृहात वेळेवर उपस्थित नसलेले कृषिमंत्री मुंडे (Dhananjay Munde) आणि कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्यासही आमदार धस यांनी तालिका सभापतींना सांगितले. सभागृहाचा सन्मान राखला गेला पाहिजे. आमची गाडी नसली तरी आम्ही टॅक्सी करून येतो. पण वेळेत सभागृहात हजर होतो आणि येथे येऊन पाहतो तर संबंधित मंत्री नाही की अधिकारी नाही, असे म्हणत आमदार धस यांनी सभागृहात चांगलीच आगपाखड केली.

आम्ही तीन-तीन जिल्ह्यांतून निवडून आलो आहे. तेथील लोकांचे प्रश्‍न मांडायला नको का? येथे उत्तर द्यायलाच कुणी नाही, तर येथे येऊन करायचे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला. हे सर्वोच्च सभागृह आहे अन् आम्ही काय पागल आहो का, इथे रिकामे येऊन बसायला. सभागृहात आम्ही काय गोट्या खेळायला येतो का, असा सवाल करत आमदार धस पुन्हा भडकले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखा महत्वाचा विषय आहे. म्हणून काल (ता. २४) आपण वेळ वाढवून घेतली. आता तुम्ही संबंधित मंत्र्यांना (Minister) आणि अधिकाऱ्यांना समज द्या, असे सभापतींना सांगितले. आपण सांगितल्याप्रमाणे मंत्री महोदय येत आहेत. त्यांना आपण १२ मिनिटे वेळ दिली आहे. तोपर्यंत महादेव जानकर बोलतील, असे म्हणत सभापतींनी आमदार धस यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

Suresh Dhas
Mla Suresh Dhas News : `खुंटेफळ`, प्रकल्पावरून आजबे-धस मागे हटेना ; आरोपांच्या फैरी सुरूच..

इतर सदस्यांनीही आमदार धस यांना पाठिंबा दिला. तेव्हा मंत्री महोदय आणि संबंधित अधिकाऱ्यांना सभागृह समज देईल, असे सभापतींनी सांगितले. त्यानंतर कुठे हा विषय शांत झाला. शेतकरी (Farmers) आत्महत्यांसारख्या विषयावर सदस्यांना बोलायचे आहे आणि ज्यांनी ऐकावे, तेच नसतील तर काय अर्थ आहे, असेही आमदार धस यांनी सुनावले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com