Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 News : दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुराव्यांदाखल पेन ड्राईव्ह सादर केला होता. तेव्हा त्या पेन ड्राईव्ह बॉम्बची जोरदार चर्चा झाली होती. आता पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला आहे. यावेळी दानवेंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे देशभर खळबळ उडाली आहे. (That pen drive bomb was heavily discussed)
आज (ता. १८) सभागृहात बोलताना दानवे म्हणाले, काही राजकीय मंडळी ज्या प्रकारे काम करतात, त्यावरून ते नियमांना छेद देत आहेत की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. मी कुण्या राजकीय पक्षाचे नाव घेत नाही. पण काही नेते ईडी, सीबीआयची भिती दाखवतात आणि या माध्यमांतून लोकांना ब्लॅकमेलिंग करतात, अशा बाबी समोर आल्या आहेत. हे सांगेपर्यंत त्यांनी कुणाचेही नाव घेतले नव्हते.
हेच व्यक्ती त्यांच्याच पक्षातील माता भगिनींना पद देतो, महामंडळ देतो, माझे ईडी सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, असे सांगून महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण करतात. काही गोष्टी बोलायला योग्य वाटत नाही. काही अधिकाऱ्यांना ईडी, सीबीआयची भिती दाखवल्याच्यासुद्धा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. अशाच विषयात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षाची आहे हे महत्वाचे नाही, तर ती अपप्रवृत्ती महत्वाची आहे, असे दानवे म्हणाले.
एका महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ दिला. त्या महिलेला मी सलाम करेल. ज्याने हे कृत्य केले, त्या व्यक्तीला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी केला जातो की काय? काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. पेन ड्राईव्हमध्ये आठ तासांचे व्हिडिओ आहेत. अशी व्यक्ती ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे, होय... किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही आहे, असे दानवेंनी म्हणताच सभागृहात जणू स्फोटच झाला.
मराठी भगिनींचे शोषण केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. राज्य सरकार महिला सुरक्षेच्या विषयी बोलते, नैतिकतेविषयी बोलते. राजकीय दलाल, उपरे राज्यात आले आहे. मराठी बांधव माता भगिनींचे शोषण करत आहे. किरीट सोमय्या असं शोषण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी काय काय केले, हे महाराष्ट्राला (Maharashtra) आणि देशाला माहिती आहे. अशा माणसाला सरकार संरक्षण देणार का, राज्य सरकार यासंदर्भात काय करणार आहे, असा सवाल अंबादास दानवेंनी सभागृहाला केला.
सोमय्यांपायी अनेक लोकांना जेलमध्ये जावे लागले आहे. आरोप खरे होते, खोटे होते हे नंतर न्यायालयाने ठरवले. पण त्या काळात त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर काय बीतली, हे त्यांचे त्यांना ठाऊक आहे. आठ तासांचे व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह मी देत आहे. केंद्र सरकार सोमय्यांचे (Kirit Somayya) संरक्षण काढणार की आणखी संरक्षण वाढवणार? हे पेन ड्राईव्ह बघून राज्य सरकारने (State Government) चौकशीचे आदेश दिले पाहिजे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी तो पेन ड्राईव्ह सभापतींकडे सोपवला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.