Vikram Kale and Mahadev Jankar
Vikram Kale and Mahadev JankarSarkarnama

Monsoon Session 2023 : ....तरच अमृत महोत्सव साजरा करण्याला काही अर्थ आहे, आमदारांनी सुनावले !

Mahadev Jankar : किमान एक हजार कोटी दिले पाहिजे.
Published on

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : मराठवाडा मुक्ती संग्रामचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १९) विधान परिषदेत निवेदन केले. त्यावर आज विधान परिषदेच्या सभागृहात चर्चा झाली. मराठवाड्याला दिलेली आश्‍वासने पूर्ण न केल्यामुळे आमदारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच चिमटे काढले. (Nanded-Yavatmal-Wardha railway line is important)

मराठवाड्यात तीर्थक्षेत्रे आहेत, पण तेथे जायला चांगले रस्ते नाहीत. अजिंठ्यासारखे प्रेषणीय स्थळे आहेत, तेथेही तीच बोंब आहे. छत्रपती संभाजी नगर ते जळगाव रेल्वेची मागणी करतोय, तीही पूर्ण होत नाही. हा मार्ग मराठवाड्याच्या विकासाला बळ देणार आहे. यावर सरकारची काय भूमिका आहे, हेसुद्धा स्पष्ट केलेले नाही.

नांदेड-यवतमाळ-वर्धा हा रेल्वे मार्ग महत्वाचा आहे. माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यासाठी प्रयत्न केले, पण तोसुद्धा अद्याप झाला नाही, असे आरोप आमदार विक्रम काळे, आमदार महादेव जानकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केले. नांदेड-यवतमाळ-वर्धा हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण त्यासाठी कुठे सकारात्मकता दिसत नाही.

यासंदर्भात स्पष्टता सरकारच्या उत्तरातून आला पाहिजे. निसर्ग कोपतो, त्याची बाधा शेतकऱ्यांना होते. मराठवाड्यात मोसंबीचे पीक होते, पण प्रक्रिया करणारा उद्योग नाही. हमीभावाने मोसंबी खरेदी करण्याची योजना मराठवाड्याला दिली पाहिजे. केशर आंब्याचे उत्पादन मराठवाड्यात होते. या आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आले पाहिजे, अशी अपेक्षा विक्रम काळे यांनी व्यक्त केली.

Vikram Kale and Mahadev Jankar
Mahadev Jankar Statement: मी कोणाकडे तिकीटाची भीक मागणारा नाही... तर मी तिकीट देणारा नेता आहे : महादेव जानकर

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे काम सुवर्ण महोत्सवी वर्षा झाले पाहिजे. वसमत आणि हिंगोली हळदीचे आगार आहे. शेतकरी हळदीचे भरपूर उत्पादन घेतात. हळद संशोधन केंद्राची मंजुरी दिली आहे. जेणेकरून पावडर, पेस्ट, सौंदर्य प्रसाधने अशी उत्पादने घेता येतील. आयआयएम संस्था नागपूरला गेली हरकत नाही, पण संभाजी नगरलाही या वर्षात दिली पाहिजे. दुसरी संस्था मुंबईला देणार आहे, हरकत नाही. पण मराठवाड्यासाठीही अशी संस्था दिली पाहिजे.

नीटच्या निकालात राज्यामध्ये सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी मराठवाड्यातील आहे. या विद्यार्थ्यांचा विचार केला जात नाही. येथे संग्रहालय झाले पाहिजे. विद्यापीठ त्यासाठी जागा देईल. त्यामुळे मराठवाड्याचा इतिहास जनतेला समजण्यासाठी सोयीचे होईल, असे काही निर्णय घेण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला, तरच अमृत महोत्सव साजरा करण्याला काही अर्थ आहे, असेही आमदार विक्रम काळे म्हणाले.

Vikram Kale and Mahadev Jankar
#Shorts | 'रावसाहेब दानवेंचा मराठवाडी शैलीत डायलॉग' | Raosaheb Danve | Marathwada | BJP |Sarkarnama

१०० कोटींनी काहीच होणार नाही..

मराठवाड्याच्या (Marathwada) अमृत महोत्सवी वर्षात सरकारने १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. पण १०० कोटींनी काहीच होणार नाही, किमान एक हजार कोटी दिले पाहिजे. तरच मराठवाड्यावर बसलेला मागासवर्गीय हा ठपका निघेल. येथे वॉटर ग्रीड नाही. चांगले रस्ते नाहीत. कर्नाटकातून आले तर विदर्भापर्यंत (Vidarbha) रस्ता चांगला आहे, अन् मराठवाडा सुरू झाला की रस्ता खराब, अशी अवस्था आहे.

उस्मानाबादला विमानतळाचा विकास करण्याची गरज आहे. हिंगोली, परभणीचाही औद्योगिक विकास झाला पाहिजे. उजनीचे पाणी आजही उस्मानाबादला मिळत नाही, पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीही पाणी मिळाले पाहिजे, हे सर्व आगामी वर्षभरात होणार असेल, तरच याला खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी वर्ष म्हणता येईल, असे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com