Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओतील ‘ती’ महिला कोण ?

Anil Parab : महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
Anil Parab and Kirit Somayya
Anil Parab and Kirit SomayyaSarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 News : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्ब फोडून खळबळ उडवून दिली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी, सीबीआयचा धाक दाखवून महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यानंतर किरीट सोमय्यांच्या कथित व्डिहिओतील ‘ती’ महिला कोण, हा प्रश्‍न पुढे आला आहे. (Who is 'that' woman, this question has come forward)

यापूर्वी विधानसभेत अभूतपूर्व परिस्थिती दोन वर्षांपूर्वी उद्धवली होती. तेव्हा खालच्या सभागृहात खूप पेन ड्राईव्ह बॉम्ब फुटले होते. आज वरच्या सभागृहात पेन ड्राईव्ह बॉम्ब फुटला आहे. भाजपच्या एका माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या खासदाराचे नाव अद्याप मी घेतलेले नाही. पण त्याने आजवर ज्यांची-ज्यांची बदनामी केली, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर काय बीतली असेल, याचा विचार आज केला पाहिजे, असे अनिल परब म्हणाले.

अंबादास दानवेंनी सांगितले की बदनामी काय असते. मी व माझ्या कुटुंबीयांनी ते सर्व भोगले आहे. राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झाले, तर तो एक राजकारणाचे भाग आहे. पण एखाद्याच्या कुटुंबावर प्रसंग येतो, तेव्हा त्या कुटुंबाचं काय होते, हे मी स्वतः अनुभवले आहे. मुलांना तपास यंत्रणेच्या समोर उभे केले जाते, घाणेरडे प्रश्न विचारले जातात. छगन भुजबळ येथे बसले आहेत. ते अडीच वर्ष जेलमध्ये होते. किरीट सोमय्या किंवा अन्य कुणाचा हा प्रश्‍न नाही, तर राजकीय जीवनात काम करण्याऱ्यांचा आहे, असे परब यांनी सभागृहाला सांगितले.

मी किंवा अन्य कुणी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून राजकीय जीवनात इथपर्यंत पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्रीसुद्धा आंदोलनातून आले आहेत. ज्यावेळी अशी बदनामी केली जाते, त्यावेळी बदनामीची उत्तरे दिली पाहिजे. कुणाचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी हे सभागृह आहे. या व्हिडिओची सत्यता बाहेर आलीच पाहिजे, ती महिला कोण, हेसुदधा बाहेर आलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

Anil Parab and Kirit Somayya
Anil Parab यांनी कायदाच सांगितला, Neelam Gorhe अडचणीत | Shivsena UBT | Disqualification Petition

एसआयटी लावा नाहीतर रॉ लावा. आमच्या बाबतीत कोणती यंत्रणा शिल्लक राहिलेली नाही. उपमुख्यमंत्र्यांचे राज्यभर नाव आहे, वारंवार ते सांगतात की, हे खपवून घेतले जाणार नाही. आता तर महिलांना फोन करून लैंगिक शोषण सुरू आहे आणि ते कालच्या व्हिडिओतून बाहेर आले आहे. गृहमंत्र्यांनी जाहीर करावे की, ते चौकशी लावणार का, असा सवाल अनिल परब यांनी केला.

आठ तासाचे व्हिडिओ आहेत. किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya) दिलेल्या पत्रकात म्हटले की कुण्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, पण व्हिडिओत मी नाही, असे सोमय्यांनी म्हटले नाही. ईडी, सीबीआयच्या (CBI) धमक्या देऊन तर हे प्रकार झाले नाही ना, हे पण शोधले पाहिजे. पहिले सोमय्यांची सुरक्षा काढा, कारण त्या सुरक्षेच्या भरवशावरच हे प्रकार हे प्रकार केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, असेही अनिल परब (Anil Parab) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com