MP Dhanorkar News : धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दंगली घडविण्याचे षडयंत्र !

Chandrapur : बहुजन समाजाने ताकदीने एकत्र येण्याची गरज आहे.
Balu Dhanorkar, Chandrapur.
Balu Dhanorkar, Chandrapur.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District News : जेव्हा जेव्हा देशात कट्टरतावादी सरकार सत्तेत येते. तेव्हा देशातीला बहुसंख्येने असलेला हिंदू बांधव धोक्यात सापडतो. देशात धार्मिक तेढ, जातीय दुरावा निर्माण करून दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा घणाघाती आरोप चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी केला. (A conspiracy is being hatched to create a riot)

देशात २०१२-१३ पर्यंत देशातील हिंदू धोक्यात नव्हते. मात्र, २०१४ पासून देशातीला हिंदूबांधव धोक्यात आहे. देशात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आणि देशाची जात धर्मापलीकडे जाऊन प्रगती करण्यासाठी कट्टरतावाद्यांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी बहुजन समाजाने ताकदीने एकत्र येण्याची गरज आहे, असेही खासदार धानोरकर म्हणाले. श्री संताजी विचार मंचातर्फे आयोजित बहुजनांचा संघर्ष आणि दिशा या कार्यक्रमात ते बोलत होते.

अॅड. वैशाली डोळस बहुजनांचा संघर्ष आणि दिशा या विषयावर बोलताना म्हणाल्या की, बहुजन समाजाला वर्ण व्यवस्थेच्या चाकोरीबद्ध व्यवस्थेने बहुजन समाजाचे मेंदूच बिनकामी केले आहेत. समता. बंधुता, न्याय ही लोकशाहीची आधारभूत तत्वे वाचविण्यासाठी बहुजन समाज एकवटत नाही. कारण त्यांच्या डोक्यात वर्णव्यवस्थेचे भूत संचारलेले आहे.

सरकारी कंपन्या कवडीमोल भावात भांडवलदारांना विकून सरकारी नोकऱ्या संपवून बहुजन समाजातील युवकांना देशोधडीला लावण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.त्यामुळे आरक्षण बंद करण्याचे नानाविध प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हातावर पोट असणाऱ्या कामगार-मजूर यांच्यासाठी जे कामगार कायदे केले. कामगारांना हक्क आणि अधिकार दिले होते. ते मोदी सरकारने रद्द केले.

Balu Dhanorkar, Chandrapur.
Balu Dhanorkar on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा नष्ट करायचा आहे...

कामगारांवर मनुप्रणित चार जाचक कायदे मंजूर करून कामगारांची क्रूर थट्टा केली आहे. शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. शिक्षणाची दारेच नव्हे तर खिडक्या सुद्धा बंद करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून बेदखल करण्याचे घातक पाप केले जात आहे. नजीकच्या काळात सर्व सरकारी (Government) कारखाने बहुजन समाजाच्या धार्मिक भावनेचा फायदा घेत विकल्या जातील आणि बहुजन समाजाला कायमस्वरूपी गुलाम केले जाईल, अशी भीतीही वैशाली डोळस यांनी व्यक्त केली.

चंद्रपूरचे लाकूड चालते, माणूस का नाही ?

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हयातून सागवान जर अयोध्येत (Ayodhya) जात असेल तर राम मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील व्यक्ती का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान जर राम मंदिराला चालत असेल तर बहुजन समाजातील व्यक्ती या व्यवस्थेला का चालत नाही, हे विचारण्यासाठी एक होण्याचे आवाहन श्रीमती डोळस यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com