खासदार धानोरकर म्हणाले, १६ वर्षांपासून झालेच नाही आरोग्य सर्वेक्षण...

खासदार धानोरकर (Balu Dhanorkar) म्हणाले, आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि बाहेर सर्वच ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औद्योगिक प्रदूषणासोबतच नागरिकांकडून होणारे प्रदूषण सुद्धा आहे.
MP Balu Dhanorkar

MP Balu Dhanorkar

Sarkarnama

Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur) औद्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलंत, राख यामुळे वायू प्रदूषण होते. दूषित वायू प्रदूषणामुळे मागील २० वर्षांपासून चंद्रपूरकर त्रस्त आहेत. सन २००५-०६ मध्ये चंद्रपूरचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात आरोग्याच्या समस्यांची भयावहता दिसून आली. तेव्हापासून १६ वर्ष झाले हे सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे आता तात्काळ आरोग्य सर्वेक्षण करावे, अशी मागणी चंद्रपूरचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

खासदार धानोरकर म्हणाले, आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि बाहेर सर्वच ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औद्योगिक प्रदूषणासोबतच नागरिकांकडून होणारे प्रदूषण सुद्धा आहे. वाहनाचा, धूर, धूळ, कचरा, लाकूड, कोळसा ज्वलंत यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. चंद्रपूर शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा या दोन ठिकाणी दररोज वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते. ही शासकीय यंत्रणेद्वारे घेतलेली नोंद आहे, मात्र जिल्हयात ज्या भागात उद्योग आहे. तिथे अशीच भयावह परिस्थिती आहे.

सन २०२१ या वर्षातील १२ महिन्यांच्या आकडेवारीत चंद्रपूरच्या प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून आरोग्यासाठी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्यातील महिने चांगले आहे. दरवर्षी या महिन्यांत हेच चित्र असते. या महिन्यातील १२२ दिवसांत ९० दिवस चांगले, २० दिवस साधारण तर २२ जून या एकाच दिवशी जास्त प्रदूषण आढळले. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्यातील महिन्यांत जास्त तापमानामुळे थोडे अधिक प्रदूषण होत असल्याचे आढळले. या महिन्यातील ११८ दिवसांत ७५ दिवस प्रदूषण जास्त होते. ३२ दिवस समाधानकारक नव्हते. १४ दिवस आकडेवारी उपलब्ध नव्हती.

<div class="paragraphs"><p>MP Balu Dhanorkar</p></div>
कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले, अखेर हुकूमशहा झुकले...

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे हिवाळ्यातील महिने थंडीमुळे हवा स्थिर असल्याने अतिशय जास्त आणि धोकादायक असतात. या महिन्यांत १२३ दिवसांत ९२ दिवस जास्त प्रदूषण होते. २६ दिवस चांगले आणि पाच दिवसांची आकडेवारी उपलब्ध नव्हती. प्रदूषणाची ही भयावह स्थिती आकडेवारीतून समोर आली आहे. आता आरोग्य सर्वेक्षण झाले तर प्रदूषणाचे शहरवासीयांवर होणारे गंभीर परिणाम समोर येतील. शासनाला त्यावर उपाययोजना करण्यासाठी निश्चित आकडेवारी मिळेल. त्याकरिता आरोग्य सर्वेक्षण करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com