Wardha Politics : गडकरींनंतर खवय्येगिरीची आवड असलेले हे खासदार पाहिलेत का...?

Deoli Tehsil : पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिली शासकीय योजनांची माहिती...
MP Ramdas Tadas in Deoli.
MP Ramdas Tadas in Deoli.Sarkarnama
Published on
Updated on

Ramdas Tadas : खवय्येगिरीच्याबाबतीत विदर्भातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांचे नाव सगळेच आवर्जून घेतात. विविध अन्नपदार्थांच्याबाबतीत ‘खाना और खिलाना’ म्हटले की गडकरींचे नाव हमखास घेतलेच जाते. अमुक एखादा पदार्थ साहेबांना आवडतो, म्हणून निकटवर्तीय कार्यकर्ते गडकरींची भेट घेण्यासाठी जाताना आजही तो जाणिवपूर्वक सोबत नेतात. अशात आता वर्ध्यातील खासदार रामदास तडस यांचेही एक छायाचित्र सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील एका गावातील समारंभ आटोपल्यानंतर खासदार तडस यांनी घेतलेल्या पाणीपुरीच्या आस्वादाचे हे छायाचित्र आहे. ‘पोटोबा’सोबतच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या स्थानिकाला रोजगार देण्याचे कामही तडस यांनी यातून साध्य केले आहे.

MP Ramdas Tadas in Deoli.
Wardha OBC Melava : ‘ती’ मंत्रिपदं अन्‌ आमदारक्या आम्ही फेकून देतो; महादेव जानकरांचा एल्गार

त्याचे झाले असे की, विविध विकासकामांच्यानिमित्ताने खासदार रामदास तडस वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. एका गावातील समारंभ आटोपल्यानंतर ते कार्यकर्त्यांसोबत पायीच निघाले. वाटेत एक महिला त्यांना हातगाडीवर पाणीपुरीची विक्री करताना दृष्टीस पडली. आपल्या सहकाऱ्यांसह तडस यांनी लागलीच पाणीपुरीची ही हातगाडी गाठली.

कार्यकर्त्यांसोबत पाणीपुरीचा आस्वाद घेत असतानाच खासदार तडस यांनी शासकीय योजनांचा प्रचारही या महिलेजवळ करून घेतला. केव्हापासून व्यवसाय करीत आहात, दररोज किती उत्पन्न मिळते, कुटुंबात किती सदस्य आहेत, उत्पन्नातून कुटुंबाचा चरितार्थ चालतो का, असा संवाद तडस यांनी पाणीपुरी विक्री करणाऱ्या महिलेशी साधला. खासदारसाहेब एक एक पाणीपुरी खात होते आणि विक्रेता महिला त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी खासदार तडस यांनी या महिलेला शासनाच्या विश्वकर्मा योजनेची माहिती दिली. त्यातून एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कसे मिळेल हेदेखील सांगितले. स्वनिधी योजनेचा लाभदेखील घेता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला. पाणीपुरीवर साऱ्यांनी ताव मारल्यानंतर खासदारांनी झालेल्या बिलाचे पैसेही चुकते केले. त्यानंतर ते वळले अशा एका मुख्य मुद्द्याकडे ज्याची चर्चा सध्या सर्वत्रच आहे. लोकसभा निवडणूक होणार आहे. घोडामैदान दूर नाही. काय वाटते कोण निवडून येणार, असा थेट प्रश्नच खासदार तडस यांनी पाणीपुरी विकणारी महिला व ठेल्याजवळ उभ्या असलेल्या लोकांना विचारला. क्षणाचाही विलंब न होता उत्तर मिळाले, ‘अजी मोदीच येनार हाय...’ उत्तर ऐकताच खासदार तडस यांच्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पाणीपुरी खातानाचा हा प्रसंग तडस यांच्या समर्थकांपैकी अनेकांनी कॅमेऱ्यात टिपला.

Edited by : Prasannaa Jakate

MP Ramdas Tadas in Deoli.
Wardha Obc Sabha : छगन भुजबळांनी ओबीसींच्या सभेला जाणं टाळलं; पण चर्चा वेगळीच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com