Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, सावत्र भावांना जागा दाखवा: फडणवीसांचा विरोधकांना चिमटा

Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray over Mukhyamantri Ladki Bahin Yojana,: महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून राज्यातील भगिनींना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. पण काही कट रचणाऱ्या सावत्र भावांनी ही योजना बंद करण्याचा घाट घातला आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis
Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Gondia News: ऐन निवडणुकीच्या काळात विविध योजना जाहीर करणाऱ्या शिंदे सरकारवर विरोधकांनी तोफ डागली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी सरकारला निधीवरुन धारेवर धरलं आहे. त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

टीबी टोली मैदानावर भाजपच्या वतीने कर्तव्यपूर्ती जन आशीर्वाद महासंमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार संजय पुराम उपस्थित होते.

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून राज्यातील भगिनींना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. पण काही कट रचणाऱ्या सावत्र भावांनी ही योजना बंद करण्याचा घाट घातला आहे. काँग्रेस, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते म्हणतात आमचे सरकार आले तर महायुतीच्या सगळ्या योजना बंद करू, मी माझ्या भगिनींना सांगतो की, आम्ही ही योजना सतत चालू ठेवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विनोद अग्रवाल यांच्या रूपाने असा चपळ आमदार लाभला हे या भागातील जनतेचे भाग्य आहे. त्यांनी भाजप कधीही सोडला नाही, पण दुप्पट वेगाने परत येण्याचे काम केले. त्यांच्या पाच वर्षांची मागील वर्षांशी तुलना केली, तर विकासकामात विनोद बाबूंचा वरचष्मा राहिला आहे, असे मी ठामपणे म्हणू शकतो.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis
Baba Siddique Dead Updates: बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या बिश्नोई गँगला बिहारच्या खासदाराचं खुलं चॅलेंज

शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वरदान ठरलेला डांगोर्ली बॅरेज आणण्याचे श्रेय केवळ विनोद अग्रवाल यांनाच आहे. डांगोर्ली नदीवर उच्चस्तरीय बॅरेज बांधावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यासोबतच गोंदियात आल्यावर रिकाम्या हाताने येऊ नका, माझ्या शेतकरी बांधवांसाठी सिंचन क्रांतीसाठी डांगोर्ली बॅरेज आणा, असेही ते म्हणाले.

विनोद अग्रवाल यांनी धानावरील हेक्टरी बोनसची रक्कम २० हजारांवरून २५ हजारांपर्यंत वाढविण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जी मागणी केली ती पूर्ण झाली असा मी शब्द देतो. आता शेतकऱ्यांना २० हजारांऐवजी २५ हजार रुपये धानावर बोनस देणार आहोत, याची मी घोषणा करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com