Mungantiwar Gondia News : ‘या’ भयंकर आजाराने ग्रासला मुनगंटीवारांचा 'हा' जिल्हा, पाच महिन्यांत २० हजार रुग्णांची नोंद...

Gondia District administration : जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे.
Sudhir Mungantiwar, Gondia
Sudhir Mungantiwar, GondiaSarkarnama
Published on
Updated on

Gondia District News : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालक असलेला गोंदिया जिल्हा एका मोठ्या भयंकर आजाराने ग्रस्त झाला आहे. कोरोनानंतर आदी गंभीर ठरलेला ‘मानसिक रोग’ या हा आजाराने गोंदियाकरांना घेरले आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल २० हजार मानसिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (District administration is working on war footing)

ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाप्रमाणे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. गोंदिया जिल्ह्यात आर्गेनिक मेंटल डिसिज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, स्मृतिभ्रंश, भीती वाटणे, दूधवीय आजार, स्किझोफ्रेनिया, उदासीनता, व्यसनाधीनता, अपस्मार (मिरगी), गतिमंद, निद्रानाश व इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात २०२३ मधील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची परिस्थिती पाहता तब्बल २० हजार २८१ जण मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनापासून ही आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. याहूनही अधिक मानसिक रुग्ण असून, या रुग्णांच्या चार पट मानसिक रोगी जिल्ह्यात असल्याचे समजते. पाच महिन्यांतील मानसिक रोगी असल्याची आकडेवारी ही २० हजारांवर असून, ही फक्त शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या अजूनही पुढे आलेली नाही. हा आजार किती झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, झोप येत नाही, निराश वाटते, मानसिकग्रस्त, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरणं व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणांनी तणावात वावरणारे गोंदियाकर मानसिक रोगी होऊ लागले आहेत. यात संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना आत्महत्या हाच एकमेव मार्ग दिसत असतो. त्यामुळे हा आजार किती भयंकर आहे हे लक्षात येते.

विशेष म्हणजे कोविड काळात गोंदियाकरांचे मानसिक आरोग्य बिघडून गेले होते. अनेक जण कोविडच्या भीतीमुळे मनातून खचून गेले आहेत. सतत मानसिक तणावात राहता राहता हजारो लोक मनोरुग्ण होऊ लागले आहेत. जिल्ह्यात अवघ्या पाच महिन्यांत तब्बल २० हजार २८१ लोकांनी मानसिक आजारावर उपचार घेतल्याची ही आकडेवारी बाहेर आली. दरम्यान, पालकमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यांनी वेळीच लक्ष घालून गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Edited By : Atul Mehere

Sudhir Mungantiwar, Gondia
Sudhir Mungantiwar News : मी लोकसभा निवडणूक लढवली, तर तुमचा काही आक्षेप आहे का, मुनगंटीवारांचा पत्रकारांना प्रश्न !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com