Mungantiwar : शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी मुनगंटीवारांचे भावनिक आवाहन !

Shivaji Maharaj : नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल.
Sudhir Mungantiwar.
Sudhir Mungantiwar.Sarkarnama

An emotional appeal by Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना पाठवण्यासाठी आवाहन केले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार आहे. राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात, असे आवाहन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी भावनिक आवाहन करणारे एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी पदाधिकारी आदींना पाठविले आहे.

सन २०२३-२०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शके ३५० हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल.

Sudhir Mungantiwar.
Chhatrapati Shivaji Maharaj; महाराजांच्या सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीचा विश्वविक्रम!

या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) कृतज्ञ स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा जागर करणे,त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून सत्कार्याची उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल आणि त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहील असा विश्वास वाटतो. शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे.

नवनवीन कल्पनांना साकार करून समाजाला गतिशील राखण्यात आपण सतत कार्यरत राहिला आहात. शिवराज्याभिषेक महोत्सव हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्याच्या दृष्टीने आपण सूचना कळविल्यास त्या बहुमोल ठरतील असेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com