Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात आज (ता. २१) खारघर येथील महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमातील अपघाताचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावरील उत्तर खरं तर सांस्कृतिक विभागाकडून अपेक्षित नाही, तर ते गृह विभागाने द्यावे, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दानवेंची चांगलीच फिरकी घेतली. (The Home Department would have given the answer)
अंबादास दानवे म्हणाले, त्या चेंगराचेंगरीनंतर काही लोकांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये भरती करण्या आले. तेथे अशा रुग्णांवर उपचारच होत नाहीत. मग त्यांना एमजीएममध्ये नेण्यात आले. शासनाने डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी नियुक्त केले होते, ते तेव्हा कुठे गेले होते? हा कार्यक्रम सरकारने ठेवला होता की संस्थेने ठेवला होता, हे कळत नाही.
खासगी संस्थेने किंवा एखाद्या राजकीय (Political) पक्षाने कार्यक्रम घेतला असता आणि त्यामध्ये जर येवढ्या लोकांचे बळी गेले असते, तर सरकारने त्यांना सुरक्षित केले असते का, असाही प्रश्न दानवेंनी केला. श्री सदस्यांना शिकवण आहे, त्यांचे संस्कार आहेत की, एकही व्यकी साधी तक्रारही करत नाही. जे मरण पावले, त्यांचे नातेवाईकही काही बोलत नाहीत. कुणी तक्रार केली नाही म्हणून काहीच करायचे नाही का, असाही सवाल त्यांनी केला.
२५ लाखाचा पुरस्कार अन् त्यावर १४ कोटींचा खर्च झाला. चौकशी समितीलाही मुदतवाढ दिली जाते. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे हा सांस्कृतिक विभागाचा विषय नाही, तर गृह विभागाचा विषय आहे. गृहविभागाने उत्तर द्यावे, असे दानवेंनी म्हटल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली.
मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, तुम्हाला हा प्रश्न गृह खात्याला विचारायचा होता, तर फॉर्म भरताना तुम्ही ‘सांस्कृतिक कार्य विभाग उत्तर देईल का?’, असे का लिहिले? तुम्ही ‘गृह विभाग उत्तर देईल का?’, असे लिहिले असते तर गृह खात्याने उत्तर दिले असते. या विषयावर जास्त वाद वाढायला नको म्हणून मग उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ‘दानवे, तुम्ही वेगळा फॉर्म भरा’, अशी सूचना केली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.