Mungantiwar On 'That' Statement : तुम्ही ट्विस्ट करू नका, व्यक्तीवर आधारित पक्ष, राजकारण आवडत नाही, असं मी म्हणालो !

Atul Save : कुणाच्याही चेहऱ्यावर तुम्हाला अस्वस्थता, दिसते आहे का?
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मला शिंदेंसोबतचे भाजप आवडत नाही, मला अजितदादांसोबतचे भाजपसुद्धा आवडत नाही. मला देशाची सेवा करणारं भाजप आवडतं, असं वक्तव्य राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली अन् लगेच महायुतीमध्ये खटके उडण्याची भाकितेही वर्तवली गेली. (There were also predictions of rifts in the Grand Alliance)

यानंतर मंत्री मुनगंटीवार यांनी या विषयावर पुन्हा भाष्य केले. ते पत्रकारांना म्हणाले, मीसुद्धा ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’चा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे. माझे ते वक्तव्य तुम्ही ट्विस्ट करू नका. ‘मला अजितदादांसोबतचे भाजपसुद्धा आवडत नाही. मला देशाची सेवा करणारं भाजप आवडतं’ याचा अर्थ असा आहे की, मला व्यक्तीवर आधारित पक्ष आणि राजकारण आवडत नाही. तर देशसेवा करणारा पक्ष आणि राजकारण आवडतो, असे ते म्हणाले.

‘इंडिया’ची बैठक मुंबईत होते आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) नेते अस्वस्थ आहेत का, असे विचारले असता, कुठेही अस्वस्थता नाहीये. माझ्याकडे बघा, माझ्या बाजूला अतुल सावे बसले आहेत. कुणाच्याही चेहऱ्यावर तुम्हाला अस्वस्थता, दिसते आहे का, असा प्रतिप्रश्‍न मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. यावेळी त्यांनी ‘इंडिया’च्या आजवर झालेल्या बैठकांवर सडकून टिका केली.

त्यांच्या नेतृत्वामध्ये देशाचे कधीही कल्याण होऊ शकणार नाही. कारण ते केवळ आणि केवळ पारिवारिक राजकारण करत आहेत. बाप मुख्यमंत्री, (Chief Minister) पोरगा पर्यावरण मंत्री, मामा सिंचनमंत्री तर भाचा ऊर्जामंत्री. असे राजकारण केल्याने देश कधीही पुढे जाणार नाही. अमेरिकेत जाऊन भारताची निंदा करणे. भारत मातेचा मृत्यू झाला, असे म्हणणे आम्ही ऐकू शकत नाही. आमचं राजकारण सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी नाही.१५-१५ वर्ष विरोधात राहिलो, पण कधी सत्तेचा मोह नाही केला, असेही ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Angry: कुणाच्या ‘मायच्या लाल’ची ताकद नाही, असं म्हणत कुणावर भडकले मुनगंटीवार ?

अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः व्यक्तीआधारित राजकारण करत नाही. तर सेवाकार्याचे राजकारण करतो. त्यांच्यासारखे राजकारण आम्ही करत नाही. त्यांच्या दोन वर्ष आठ महिन्यात त्यांनी केले तरी काय, हे सांगण्यासाठीही त्यांच्याकडे काही नाही, असा आरोपही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com