Sudhir Mungantiwar on Ambadas Danve's Questions : महाराष्ट्रातील कलावतांचे सन्मानधन आणि पेन्शनसाठी वयोमर्यादा कमी करण्याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंदिरात जाऊन भजन करणाऱ्यांची संख्या वाढू नये, म्हणून वयोमर्यादा कमी करू नये, असे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
शाहीर आणि कलावंतांचे मानधन मर्यादित आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर मानधन वेगवेगळं दिलं जातं. मानधनाची १०० प्रकरणे प्रत्येक जिल्ह्यात केली जातात. जिल्हे लहान मोठे आहेत. त्यामुळे अन्याय होतो. हा निकष लोकसंख्यानिहाय करा, असेही दानवे म्हणाले. जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर वेगवेगळे मानधन आहे. अन् त्यातही उशिरा मिळते. यात सुधारणा करण्याचीही मागणी दानवेंनी केली.
संस्कृती लोककलांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता जगातही चर्चा होत आहे, ती हॅपिनेस इंडेक्सची. या प्रश्नांवर समिती बसली आहे. अहवालसुद्धा आला आहे. जिल्हे लहान मोठे असताना कलावंतांची संख्या एकसारखीच ठेवणे चुकीचे आहे. सहा महिन्यांच्या मुलाला एक चपाती आणि २५ वर्षांच्या व्यक्तीलाही एक चपाती देण्यासारखे आहे. आणि लोकसंख्येचाही निकष चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे कलावंतांच्या संख्येवर यापुढे सन्मानधन आणि पेन्शन देण्यात येईल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यातील कलाकारांची संख्या लक्षात घेतली जाणार आहे. निश्चितपणे बदल करणार आहे. संख्या जिल्हानिहाय न ठेवता तर्कावर आधारीत रूप त्याला देणार आहोत. वृद्ध कलावंताना आपण पेन्शन देतो. तो मरण पावल्यावर त्याच्या पत्नीलासुद्धा ते देतो. देशात सुदैवाने देशात सन्मानधन आपल्याच राज्यात जास्त आहे. हे सांगताना मुनगंटीवार यांनी इतर राज्यातील आकडे सभागृहाला सांगितले.
केरळमध्ये १५०० रुपये, कर्नाटक १५००, ओडीसा १२००, तेलंगणा, १५०० तामिळनाडू, १५०० पश्चिम बंगाल १०००, उत्तर प्रदेश १००० या सर्वांपेक्षा जास्त रक्कम आपण देतो. ३००० रुपये महाराष्ट्रात (Maharashtra) दिले जातात. कलावंतांच्या वर्गवारीनुसार २०११ मध्ये अ वर्गातील कलावंतांना १४०० रुपये देण्यात येत होते. ते फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार असताना २०१४ मध्ये २१०० रुपये केले. २०२१ मध्ये ३०५० केले. ब वर्गामध्ये रकमेत वाढ केली. क वर्गामध्ये २०११ मध्ये १००० रुपये होते, ते आता २२५० रुपये केले असल्याची माहिती मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.
समितीचा अहवाल आल्यानंतर वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पूर्वी ६० वर्षांनंतर पेन्शन देत होतो. आता ती वयोमर्यादा कमी करून ५० वर्ष केली आहे. भजन म्हणणाऱ्यांनी आपण मानधन देतो. येथेही वयोमर्यादा कमी केल्यास मंदिरात जाऊन भजन करणाऱ्यांची संख्या वाढू नये. म्हणून विचार केला पाहिजे. असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर संख्या वाढावी, चांगली गोष्ट आहे. पण अनुदानित भजन म्हणणाऱ्यांची संख्या वाढू नये, असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.