Mungantiwar's Emotional News : मुनगंटीवार झाले भावुक; अन् मुख्यमंत्र्यांना म्हणाले, तात्काळ मार्ग काढावा लागेल !

Mungantiwar has given a letter to Eknath Shinde : मुनगंटीवारांनी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.
Eknath Shinde and Sudhir Mungantiwar
Eknath Shinde and Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mungantiwar wrote a letter to Eknath Shinde : आपण अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहात. तळागाळातील लोकांच्या वेदना आपण जाणता. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश देऊन निराधारांना दिलासा द्या, अशी भावनिक साद राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातली आहे. (Direct disbursement of funds immediately)

सध्या सण, उत्सवांचे दिवस सुरू आहेत आणि पूर परिस्थितीमुळे गरीब लोक मेटाकुटीस आले आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला तात्काळ मार्ग काढणे आवश्‍यक आहे. कारण संजय गांधी निराधार योजनेचे पैसे संबंधित लोकांना मिळाले, तरच ते काही तरी करू शकतील. त्यामुळे लक्ष घालून हा विषय मार्गी लावला पाहिजे, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

यासंदर्भात मंत्री मुनगंटीवारांनी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. यामध्ये ते म्हणतात, राज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले आणि या योजनेच्या पेन्शनमधून उदरनिर्वाह चालविणारे लाखो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त, विधवा, घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या योजनेची मासिक रक्कम गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

यामध्ये विशेषत्वाने ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह केवळ संजय गांधी निराधार योजनेच्या आधारावर आहे. अशा लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट येऊ नये, यासाठी आपण या विषयात लक्ष द्याल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

गरिबांची उपेक्षा..

राज्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. सध्या सण-उत्सव प्रारंभ झाले आहेत. अशात सर्वत्र उत्साह असताना या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीच्या वाट्याला मात्र प्रतीक्षा येत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला नक्कीच तात्काळ मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे.

या महत्त्वाच्या विषयाकडे आपण लक्ष देऊन, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Edited By : Atul Mehere

Eknath Shinde and Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar News : मुनगंटीवारांनाही झाला सोहमची भेट घेण्याचा मोह, कोण आहे हा मुलगा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com