Mahavikas Aghadi Mahagaon.
Mahavikas Aghadi Mahagaon.Sarkarnama

Yavatmal BJP News: ‘आऊटगोइंग’ माहीत नसलेल्या भाजपचा गटनेताच लावला गळाला, अन...

MVA Vs BJP News: नगरपंचायतीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने विजय मिळवला.

Yavatmal - Mahagaon News : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी अधिक मजबूत झाल्याचे त्यानंतर झालेल्या निवडणुकांमधून बघायला मिळाले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका असो वा कृषी उत्पन्न बाजार समितींच्या. यामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवले. (Mahavikas Aghadi achieved resounding success)

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराने भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर आपल्या उमेदवारांना विजयश्री मिळवून दिली. महाविकास आघाडीची घोडदौड अशीच कायम राहिल्यास आगामी निवडणुका शिंदे-भाजप-पवार सरकारला जड जातील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

‘आऊटगोइंग’ माहीतच नसलेल्या भाजपच्या तटबंदीला जोरदार धडक देत महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्यावर झेंडा फडकावला. भाजपच्या गटनेत्याला आपल्या तंबूत डेरेदाखल करून महाविकास आघाडीने भाजप आणि शिवसेना युतीला जोरदार धक्का देत महागाव नगरपंचायतीची सत्ता काबीज केली.

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सुनंदा सुरोशे यांनी १७ पैकी तब्बल १२ मते मिळवीत नगराध्यक्षपदाला गवसणी घातली. भाजप शिवसेना युतीच्या नगरसेविका रंजना आडे यांना केवळ पाच मते मिळाल्याने त्यांना नामुष्कीच्या पराभवाला सामोरे जावे लागले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे अवसानच गळाले.

Mahavikas Aghadi Mahagaon.
मंत्र्याचे अजब विधान, बघा काय म्हणाले ? | BJP | Vijaykumar Gavit | Sarkarnama Video

युतीकडून उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्रही दाखल करण्यात आले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख तथा नगरसेवक प्रमोद ऊर्फ शाका भरवाडे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या धमाकेदार विजयामुळे उत्साह दुणावलेल्या महाविकास आघाडीने शहरात वाजत गाजत मिरवणूक काढली आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कामाला लागला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक आहेतच आता विरोधी पक्षनेते बनलेले विजय वडेट्टीवारांची तोफही धडाडू लागली आहे.

Mahavikas Aghadi Mahagaon.
Raosaheb Danve : 'शिंदे गट, भाजप आणि अजितदादा गटात कोणताही वाद नाही'| BJP | Sambhajinagar |

शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांच्या शिलेदारांना महत्वाच्या मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि ते कामाला लागले आहेत. तिकडे उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरेसुद्धा एक-एक करून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कामाचा वेग असाच कायम राहिल्यास महायुतीला आगामी निवडणुका जड जातील, ही शक्यता नाकारता येणार नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com