Nagpur BJP News : कार्यालये बंद करून आराम करणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपने फटकारले, दिला ‘हा’ इशारा !

Nagpur Municipal Corporation : हा आराम आगामी निवडणुकीत महागात पडू शकतो.
Nagpur BJP
Nagpur BJPSarkarnama

The Municipal Corporation is managed by the Administrator : नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपून वर्ष उलटले. महानगरपालिकेचा कारभार प्रशासक करत आहे. त्यामुळे बव्हंशी नगरसेवकांनी आपली कार्यालये बंद केली आणि आराम करत आहेत. पण हा आराम आगामी निवडणुकीत महागात पडू शकतो. म्हणून भाजपने माजी नगरसेवकांना कार्यालये उघडण्याचे आदेश दिले आहेत. (BJP has ordered former corporators to open offices)

पक्षाच्या आदेशाकडे याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना विचार केला जाईल, असा इशारा माजी नगरसेवकांना देण्यात आला आहे. महापालिकेचा कार्यकाळ वर्षभरापूर्वी संपला आहे. तेव्हापासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. अधिकार संपुष्टात आल्याने नगरसेवकांनीही काम बंद केले आहे. सध्या जनतेला काही समस्या असल्यास थेट महापालिका कार्यालयासोबत संपर्क साधावा लागत आहे.

प्रत्येकजण कार्यालयात पोहोचू शकत नाही. तक्रारीनंतर समस्या सुटेलच याचीही खात्री नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. नगरसेवक काहीच कामाचे नसल्याचा त्यांचा समज झाला आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची भीती भाजपला सतावत आहे. महापालिकेची निवडणूक केव्हा होईल याची कुठलीच शाश्वती नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यायचा आहे.

महाविकास आघाडीने केलेली प्रभागरचना महायुतीचे सरकार येताच बदलण्यात आली आहे. सोबतच नगरसेवकांची संख्याही वाढवण्याच्या मुद्द्यावर न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले आहे. या प्रकरणाचे निकाल डिसेंबरच्या आत लागले नाहीत तर लोकसभेनंतरच महापालिकेची निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते सुस्तावले आहेत. अनेकांनी कामे बंद केली आहेत.

Nagpur BJP
Nitin Gadkari यांनी सांगितला जुना किस्सा, चूकही केली मान्य | BJP | Nagpur | Sarkarnama Video

जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा बघू असा विचार अनेकांनी केला आहे. भाजपतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. कार्यकर्त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यात पुन्हा महापालिकेची कामे ओढवून घेण्यास कोणी फारसे उत्सुक नाहीत. मात्र आता पक्षाचा आदेशच आल्याने माजी नगरसेवक आणि महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांना पुन्हा सक्रिय व्हावे लागणार आहे.

शहराध्यक्षाची नजर..

मागील निवडणुकीत (Election) भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. यंदा १३० चे टार्गेट ठेवले आहे. भाजपने (BJP) नगरसेवक व महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांच्या हाती शहराचे स्टेअरिंग दिले आहे. शहराध्यक्ष होताच बंटी कुकडे यांना महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीची अवघड परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे तेसुद्धा कोण कार्यालय उघडतो आणि बंद ठेवतो याकडे नजर ठेवून आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com