Nagpur BJP News : भाजपला भाकरी फिरवावी लागणार, पण नेत्यांची नाही; तर…

BJP : भाजपचे नेते व माजी नगरसेवकांवर सर्वसामान्यांपेक्षा स्वपक्षाचे कार्यकर्तेच अधिक नाराज आहेत.
Nagpur BJP
Nagpur BJPSarkarnama
Published on
Updated on

BJP Nagpur City Politics News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचा प्रयोग केल्यानंतर भाजपनेही भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. प्रदेश कार्यकारिणीत बदल केल्यानंतर राज्यातील बव्हंशी जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. याशिवाय त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडली आहे. (Another responsibility on hime)

भाजपचे नेते व माजी नगरसेवकांवर सर्वसामान्यांपेक्षा स्वपक्षाचे कार्यकर्तेच अधिक नाराज असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. नेते आणि कार्यकर्त्यांमधील या दुराव्याला नेत्यांच्या ‘पीएंना’ जबाबदार ठरवल्याने चहापेक्षा गरम असलेल्या या केटल्यांना शांत कसे करायचे, असा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.

महापालिका, नंतर लोकसभा व त्यापाठोपाठ विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे आणि उमेदवारांचे भवितव्य काय राहील, याकरिता पक्षाच्यावतीने एक गोपनीय सर्वे करण्यात आला होता. या सर्वेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचेसुद्धा मत जाणून घेण्यात आले. त्यात नेत्यांचे ‘पी.ए.’ विरोधात खदखद व्यक्त करण्यात आली.

कामे करणे तर सोडा मात्र काही पीए नेत्यांना भेटू देत नाहीत, बोलू देत नाहीत, अशी सामूहिक तक्रार अनेक कार्यकर्त्यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता भाकरी फिरवायची असेल तर नेत्यांच्या पीएंचीच फिरवावी लागेल असे एकूण भाजपमध्ये बोलले जात आहे.

Nagpur BJP
Cheating With MLAs of Nagpur: आमदार कुंभारेंना भोजन व्यवस्थेसाठी, तर आमदार सावरकरांना मागितले मंत्रिपदासाठी पैसे !

नागपूर महापालिकेत सुमारे पंधरा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. या दरम्यान शहराचा मोठा विकास झाला हे सर्वच मान्य करतात. मात्र फक्त विकासावर भाजपचे नगरसेवक निवडून येतील, याची खात्री कोणालाच नाही. चारच्या प्रभागामुळे अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर फिरकलेच नाहीत. छोटी-छोटी कामेही होत नसल्याची नाराजी आहे.

नगरसेवक डोळ्यांनी दिसत नाही आणि आमदार, नेत्यांपर्यंत त्यांचे स्वीय साहाय्यक पोहोचू देत नाही. त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा नाराज आहेत. कर्नाटकमध्ये (Karnataka) भाजपला सत्ता गमावावी लागली. महाराष्ट्रात (Maharashtra) फोडाफोडीचे राजकारण आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालल्याने भाजपच्या (BJP) नेत्यांना सावध राहावे लागणार असल्याचे दिसून येते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com