
Huge resentment against BJP corporators : आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. नागपूर महानगरपालिकेचा विचार करता मागील वेळी भाजपने चारचा प्रभाग करून निवडणूक लढली. पण आता भाजप स्वतःच्याच जाळ्यात अडकल्याचे दिसते. (BJP seems to be stuck in its own trap)
मागील महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग करून काँग्रेसला अडचणीत टाकणारी भाजप आता आपल्याच सापळ्यात अडकली आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात प्रचंड नाराजी असल्याने आता पुन्हा प्रभागांची सीमा बदलवण्याचा विचार केला जात असल्याचे समजते.
मागील निवडणूक मोठ्या संख्येने कशी जिंकता येईल, यासाठी भाजपने चार सदस्यांचा प्रभाग केला होता. त्याचा भरघोस फायदाही भाजपला झाला होता. १५० पैकी भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि चार सदस्यांमध्ये कुठलाही समन्वय नसल्याचा लाभही भाजपला झाला होता.
एका प्रभागात चार सदस्य निवडून आल्यानंतर जबाबदाऱ्या आणि कामाच्या वाटणीवरून पेच निर्माण झाला होता. त्यानंतर पक्षाने प्रत्येक नगरसेवकाकडे चारपैकी एका वॉर्डाची जबाबदारी दिली होती. त्यातील अनुभवी नेत्याला इतरांचा नेता केले होते. त्यामुळे उर्वरित तीन नगरसेवकांनी फारसे कामच केले नाही.
महिला नगरसेविकांच्या पतींनीच सर्व व्यवहार सांभाळले. त्यामुळे नगरसेविका व त्यांचे काम नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. काही महिला नगरसेविका निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकल्याच नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
अनेकांना नगरसेवकाचे नावसुद्धा माहिती नाही. पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली तर पराभवाची दाट शक्यता भाजपला दिसत आहे. तिकीट कापले तर पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या पती व त्यांच्या समर्थकांची नाराजी ओढवण्याची शक्यताही आहे. त्यावरून चारच्या प्रभागाच्या सापळ्यात भाजप स्वतःच अडकल्याचे दिसून येते.
प्रभागांची तोडफोड होणार..
भाजपचे पुन्हा चार सदस्यांच्या प्रभागानुसार निवडणूक लढवण्याचे जवळपास ठरवले आहे. नागरिकांची नाराजी बघता आता प्रभागांच्या सीमा बदलवण्याचा विचार केला जात आहे. प्रभागाची तोडफोड केल्यानंतर निवडणुकीला सामोरे जाताना वेगळे चित्र दाखवण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केले जाणार आहे.
मागील निवडणुकीच्यावेळी शहरात सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) आमदार होते. त्यातून आता दोन वजा झाले आहेत. याशिवाय महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) मागील निवडणुकीत सत्ताधारी आणि नगरसेवकांच्या विरोधात आता आहे तेवढा रोषसुद्धा नव्हता. दुसरीकडे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग महापालिकेत केला जाणार असल्याने मतविभाजनाचा धोका आता बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाजू लक्षात घेता भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.