Nagpur BJP Lok Sabha Chief: भाजपचे शहराध्यक्ष दटकेंवर नागपूर, तर जिल्हाध्यक्ष गजभीयेंवर रामटेकची जबाबदारी !

Nagpur BJP City President Pravin Datke : आमदार प्रवीण दटके यांना नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली.
Pravin Datke and Arvind Gajbhiye
Pravin Datke and Arvind GajbhiyeSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha BJP Lok Sabha Elections Chief News: भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याकरिता प्रत्येक लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (ता. ८) प्रमुखांची नावे जाहीर केली. (State president Chandrasekhar Bawankule announced the names of the chiefs)

नागपूर शहरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून किशोर वानखेडे तर पूर्व नागपूरचे प्रमुख म्हणून प्रमोद पेंडके, मध्य नागपूर बंडू राऊत, पश्चिम संदीप जाधव, उत्तर माजी आमदार गिरीश व्यास यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निवडणूक प्रमुख अनेक वर्षांपासून संबंधित मतदारसंघातच कार्यरत आहेत.

ग्रामीणमधील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून डॉ. राजीव पोतदार यांनी नेमणूक करण्यात आली आहे. ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते तसेच मागील विधानसभेची निवडणूक त्यांनी आमदार सुनील केदार यांच्या विरोधात लढली होती.

काटोलमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिलेले चरणसिंग ठाकूर, हिंगण्यात नरेश चरडे, उमरेडमध्ये सुधीर पारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामठी अजय बोढारे, रामटेक सुधीर मेंघर यांना निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

Pravin Datke and Arvind Gajbhiye
BJP leaders Letter to Rahul Gandhi : राहुल गांधींच्या "मोहब्बत की दुकान' ला भाजपचं सडेतोड उत्तर ;'नफरत का मेगामॉल'..

विदर्भातील लोकसभा मतदारसंघ प्रमुख..

शहर भाजपचे अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांना नागपूर (Nagpur) लोकसभा तर ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांना रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे. भंडारा-गोंदियाचे प्रमुख म्हणून विजय शिवणकर, गडचिरोली किसन नागदेवे, वर्धा सुमित वानखेडे आणि चंद्रपूर प्रमोद कडू यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पश्‍चिम विदर्भातील (Vidarbha) अकोला लोकसभा मतदारसंघासाठी खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, अमरावती (Amravati) जयंत डेहनकर, बुलढाणा विजयराज शिंदे आणि यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी नितीन भुतडा यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com