Nagpur Congress News : गडकरींच्या वाड्याभोवताल, भाजपच्या गडात आज कॉंग्रेसची संवाद यात्रा !

Congress : दुपारी अडीच वाजता देवडिया काँग्रेस भवनातून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे.
Nana Patole and Nitin Gadkari
Nana Patole and Nitin GadkariSarkarnama

Congress dialogue tour around Gadkari's Palace : राज्याच्या उपराजधानीत कॉंग्रेसही आता इलेक्शन मोडवर आल्याचे जाणवत आहे. ज्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाने गेल्या वेळी कॉंग्रेसला थोडक्यात हुलकावणी दिली होती, तेथेच आज (ता. सात) कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा निघते आहे. या यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेस एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. (Yatra will start from Devadia Congress Bhavan at 2:30 PM)

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्धापनदिन आणि जन्माष्टमीचे औचित्य साधून काँग्रेसतर्फे आजपासून (ता. सात) प्रचाराची दहीहंडी फोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याच्या सभोवताल आणि भाजपच्या गडात संवाद यात्रा भ्रमण करणार असून त्यानंतर संवाद सभा घेण्यात येणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात दुपारी अडीच वाजता देवडिया काँग्रेस भवनातून जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, (Vikas Thakre) माजी मंत्री आमदार नितीन राऊत, (Nitin Raut) सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) आमदार अभिजित वंजारी, डॉ. अनिस अहमद, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राजू पारवे, नाना गावंडे, बंटी शेळके, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे आदी पदाधिकारी यात प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.

संवाद यात्रा शिवाजी पुतळा, दसरा रोड, सूतिकागृह महाल, झेंडा चौक, आयचित मंदिर, लाकडी पुल, चंद्रशेखर आझाद चौक, मारवाडी चोक, नेहरु पुतळा, भारतमाता चौक, मस्कासाथ, गोळीबार चौक, मोमिनपुरा, दोसर भवन चौक, बजेरिया, गंजीपेठ, भालदारपुरा, फवारा चोक, अग्रसेन चोक, लालइमली चौक अशी फिरून जैन भवन येथे यात्रेचे समापन होईल. त्यानंतर साडेपाच वाजता इतवारी जैन भवन येथे जनसंवाद सभा घेण्यात येणार आहे.

Nana Patole and Nitin Gadkari
Gadchiroli News | Nana Patole यांचा मोठा दावा; BJPमध्ये हिंमत नाही, आम्ही ते करुन दाखवतो |

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सातत्याने विजय हुलकावणी देत आला आहे. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने काँग्रेस पराभूत झाली होती.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा फटका त्यांना बसला. त्यामुळे मध्य नागपूरवर जोर देऊन काँग्रेसतर्फे निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करणार असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com