Nagpur Congress News : ‘भारत जोडो’त जे झाले नाही, ते आता नागपुरात घडले; दिग्गज कॉंग्रेस नेत्यांचे हातात हात !

Congress Leaders : संकल्प यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते पुन्हा एकत्रित येऊ लागले आहेत.
Vilas Muttemwar, Satish Chaturvedi and Nitin Raut
Vilas Muttemwar, Satish Chaturvedi and Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

Congress leaders sheathed their swords of opposition : नागपुरात कॉंग्रेस नेत्यांचा एकमेकांना किती टोकाचा विरोध आहे, हे सर्वश्रुत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वेळीसुद्धा नागपुरातील नेते एक झाले नव्हते. तेव्हा जे झाले नाही, ते आता शक्य झाले आहे. आगामी निवडणुकांसाठी कॉंग्रेस नेत्यांनी विरोधाच्या तलवारी म्यान केल्याचे संकल्प यात्रेत दिसून आले. (Even during the Bharat Jodo Yatra, the leaders of Nagpur were not united)

संकल्प यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते पुन्हा एकत्रित येऊ लागले आहेत. मंगळवारी (ता. २२) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत रविभवन येथे झालेल्या बैठकीत माजी मंत्री केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी चक्क हातात हात घालून विजयाचा संकल्प केला.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. तेव्हाही काँग्रेस नेते एकत्र आले नव्हते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री असलेल्या नितीन राऊत यांच्याकडे यात्रेदरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे नागपुरातील अनेक नेत्यांनी या जिल्ह्यांत जाण्याचे टाळले होते.

कॉंग्रेसचे जे नेते अमरावती आणि अकोल्यात गेले नव्हते, ते बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेत सहभागी झाले होते. यावरून शहरातील नेत्यांचे आपसातील मतभेद किती टोकाचे आहेत हे दिसून आले. मागील महापालिकेच्या निवडणुकीत मुत्तेमवार आणि चतुर्वेदी यांच्या गटामध्ये वितुष्ट आले होते.

Vilas Muttemwar, Satish Chaturvedi and Nitin Raut
Vijay Wadettiwar On BJP : "जनता तुम्हाला नाकारतीये" | Congress | Nagpur | Sarkarnama Video

आता या निवडणुकीला सुमारे सात वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हापासून दोन्ही गट एकमेकांच्या कार्यक्रमांना जात नाही. चतुर्वेदी गट देवडिया काँग्रेसची पायरी चढत नाही. चतुर्वेदी, नितीन राऊत आणि सुनील केदार एकीकडे तर विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे, अभिजित वंजारी दुसरीकडे असेच चित्र दिसत होते. चतुर्वेदी गट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही नाराज होता.

केदार (Sunil Kedar) आणि वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली होती. राज्यातील सत्ता गेली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर असल्याने काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी आपल्या मतभेदाच्या तलवारी म्यान केल्याचे दिसून येते. संकल्प यात्रेसाठी ही सर्व मंडळी आपसातील मतभेद विसरून एकत्र आली आणि हातात घातल्याने कार्यकर्ते खुश झाले आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com