Members are opposed to this work : जिल्हा परिषदेने कौशल्य विकासअंतर्गत जिल्ह्यातील १० ते १२ गावांमध्ये ग्रीन जिम लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या कामाला बव्हंशी सदस्यांचा विरोध आहे. ग्रीन जिम उभारणे हे कौशल्य विकासच्या लेखाशिर्षात येत नसल्याचे कॉंग्रेस नेत्यांचे स्पष्ट म्हणणे आहे. (MP Tumane had given recommendation letter twice)
रामटेक लोकसभा मतदारसंघात जिल्हा खनिज कल्याण निधी आरोग्य सुविधेवर खर्च करण्याऐवजी तब्बल १३ कोटी रुपयांची उधळपट्टी ग्रीन जिमवर करण्यात येणार आहे. हे काम नियमबाह्य होत असल्याची शंका काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त करून यावर खासदार कृपाल तुमाने यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. त्यावर तुम्हाला शंका असेल तर तपास करा, असे आव्हान खासदार तुमाने यांनी दिले आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे नेते उदयसिंह यादव आणि किशोर गजभिये यांनी सांगितले, की या खनिज निधीसाठी खासदार तुमाने यांनी दोनदा शिफारस पत्र दिले होते. तसेच त्यांच्या पत्रावरून एजंसी बदलण्यात आली. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत कौशल्य विकासासाठी रामटेक, उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण, पारशिवनी, सावनेर, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील २०० गावांमध्ये ग्रीन जिम लावण्यास मंजुरी देण्यात आली होती.
खासदार तुमाने यांच्या पत्रावर या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकारी विमला. आर यांनी मंजुरी दिली होती. ग्रीन जिम लावण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना नोडल एजंसी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर तुमाने यांनी पत्र देऊन जिल्हा परिषदेकडे हे काम देण्याची सूचना केली होती.
मूळ किमतीपेक्षा दुप्पट खर्च..
खनिज कल्याण निधीचा उपयोग प्रभावित क्षेत्रातील आरोग्य सुविधेवर खर्च करणे अपेक्षित असल्याचे उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती देण्यात आली आहे. ग्रीन जिममधील साहित्यासाठी मूळ किमतीपेक्षा दुप्पट खर्च करण्याचे प्रयत्न केले जात आहे. या विरोधात न्यायालयात (Court) याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अनेक सरपंचांनी ग्रीन जिम लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपण शिफारस केली होती. तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी यास मंजुरी दिली होती. यावर झालेल्या खर्चावर कोणाला शंका असल्यास तपास करावा. या सर्व प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, असे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.