Nagpur Double Murder : डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारला, अन् काही तासांतच ‘डबल मर्डर’ची सलामी !

Dr. Ravindrakumar Singal : कृष्णकांत आणि सनी यांनी किरणला दुचाकी घेण्यासाठी पैसे व्याजाने दिले होते.
Crime at Nagpur
Crime at NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Double Murder : नागपूर शहराचे नवे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काल (ता. 1) रात्रीच लगबगीने पदभार स्वीकारला. त्यानंतर काहीच तासाने शहर दुहेरी खुनाने हादरले. त्यामुळे नव्या पोलिस आयुक्तांना नागपुरात खुनाने सलामी मिळाल्याची चर्चा रंगली होती.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पदभार स्वीकारताच, शहरात काल रात्री दुहेरी खुनाची थरारक घटना घडली. फायनान्सवर दुचाकी घेऊन त्याचे पैसे आणि इतर पैशांच्या देवाण-घेवाणातून एका मित्राने दोन मित्रांवर लाकडी दांड्याने वार करीत त्यांचा खून केला. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात काल रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

Crime at Nagpur
Nagpur Honeytrap Case : नागपुरातील आणखी काही पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर !

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. कृष्णकांत भट (वय 24 रा. श्‍यामधाम मंदिराजवळ, नंदनवन) आणि सनी धनंजय सरूडकर (वय 33, रा. जलालपूरा, गांधीबाग) अशी मृतांची नावे आहेत. किरण शेंडे (वय 30), योगेश शेंडे (वय 25, दोन्ही रा.साईबाबानगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदार होते. किरण आणि योगेश शेंडे हे पारडीतील ऑटोडील्स मोटर डिलरकडे कामाला होते. ते साईबाबानगरात भाड्याने राहत होते. मृत कृष्णकांत आणि सनी हे दोघेही फायनान्सचे काम करीत होते. तसेच ते व्याजानेही पैसे देण्याचे काम करायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण त्यांचा मित्र असल्याने कृष्णकांत आणि सनी यांनी किरणला दुचाकी घेण्यासाठी पैसे व्याजाने दिले होते. काही महिने किरणने नियमित व्याजाचे हप्ते भरले. मात्र, त्यानंतर त्याने ते पैसे भरणे बंद केले. त्यामुळे कृष्णकांत आणि सनी हे दोघेही त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होते. मात्र, किरण त्यांना वारंवार टाळत होते. दरम्यान गुरुवारी किरणने त्यांना रात्री 10.30 वाजताच्या सुमारास साईबाबा येथील घरी पैशाच्या वाद मिटविण्यासाठी बोलाविले.

तेथे आल्यावर कृष्णकांत आणि सनी यांनी त्याला व्याजाचे पैसे आणि फायनान्सचेही हप्ते मागितले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे किरण, त्याचा लहान भाऊ योगेश त्यांच्या दोन साथीदारांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किरण आणि योगेशने लाकडी दांड्याने डोक्यावर वार करण्यास सुरुवात केल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे चौघेही पळून गेले. दरम्यान नागरिकांनी वाठोडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, तपास सुरू केला. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी किरण आणि योगेशसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com