Assembly Election 2024 : नागपूरचे माजी महापौर आहेत कुठे? लढविणार का निवडणूक?

Nagpur Assembly Election 2024 : नागपूरमधील काही माजी महापौरांना मतदारसंघाची अडचण जाणवत आहे, तर काहींना विधानसभेचे वेध लागले आहेत.
nagpur corporation.jpg
nagpur corporation.jpgsarkarnama
Published on
Updated on

विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. शहराच्या माजी महापौरांचाही यात समावेश आहे. काही माजी महापौरांना मतदारसंघाची अडचण जाणवत आहे, तर काहींना विधानसभेचे वेध लागले आहेत.

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांना आपला मुक्काम मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून पश्चिम नागपूरमध्ये हलवला आहे. श्रावण मासानिमित्त त्यांनी पार्थिव शिवलिंग पुजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

पश्चिम नागपूरमधून भाजपने ( Bjp ) उत्तर भारतीयांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी मागील निवडणुकीपासून केली जात आहे. भाजपने उत्तर भारतीयांचा यंदाच्या निवडणुकीत विचार केल्यास तिवारी यांचे नाव आघाडीवर राहणार आहे. असे झाल्यास त्यांचा लढा काँग्रेसचे माजी महापौर तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष, पश्चिमचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्यासोबत होईल.

nagpur corporation.jpg
RSS-BJP Election Strategy : लोकसभेत भाजपला फटका बसला; विधानसभेला मदतीला ‘संघ’ धावला!

माजी महापौर नंदा जिचकार यांचेही नाव येथून अधून-मधून झळकत असते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन महापौर इच्छुक आहे. प्रवीण दटके येथून तयारीला लागले आहेत. ते सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. या मतदारसंघात भाजपचे आमदार विकास कुंभारे चार वेळा निवडून आले आहे. जातीय समीकरणामुळे दटके यांना येथे अडचण होऊ शकते. माजी महापौर अर्चना डेहनकर यासुद्धा याच मतदारसंघातून संधीच्या शोधात आहेत.

काँग्रेसचे माजी महापौर नरेश गावंडे हे पूर्व नागपूरमधून प्रयत्न करीत आहेत. महापौरनंतर ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे ते सध्या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे अनेक दावेदार आता तयार झाले आहेत.

nagpur corporation.jpg
Devendra Fadnavis : महाआघाडीच्या ‘स्ट्रॅटेजी’ने भाजप अलर्ट; ‘रामटेक’ होण्याची भीती

महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संदीप जोशी यांनी महापालिकेची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यांना विदर्भ विभागीय पदवीधर मतदारसंघातून भाजपने संधी दिली होती. माजी महापौर व पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार अनिल सोले हेसुद्धा राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांच्यासाठी नागपूर जिल्ह्यात एकही मतदारसंघ राखीव नाही. ही बाब त्यांच्यासाठी अडचणीच ठरत आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस, विकास ठाकरे आणि अनिल सोले हे नागपूरचे महापौर होते. फडणवीस थेट मुख्यमंत्री झाले. ठाकरे सध्या पश्चिम नागपूर गाजवत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी कडवा लढा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com