Nagpur : विदर्भाच्या विकासासाठी गडकरींनी उचलले नाविन्यपूर्ण पाऊल

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात इलेक्ट्रीक वाहने वापरण्यावर भर दिल्यास जंगलातील वाहनांचा आवक कमी होईल आणि वाघासह वाहनांच्या संख्या वाढेल. (Nitin Gadkari)
Central Minister Nitin Gadkari
Central Minister Nitin GadkariSarkarnama

नागपूर : विदर्भाचा विकास व्हावा या उद्देशाने खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन १२ ते १४ मार्च दरम्यान, हिगणा एमआयडीसी असोसिएशनच्या आयएमए हॉलमध्ये केले आहे. (Nagpur) या माध्यमातून विदर्भातील कृषी आणि सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर भर देण्यासह या विभागाच्या विकास व्हावा. युवकांनी उद्यमशील, उद्योग आणि निर्यात वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार वाढावा हा उद्देश या महोत्सवाचा आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra)

खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत राष्ट्रीय औद्योगिक परिषद, प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एमएसएमई देशाच्या विकासाचा कणा आहे. उद्योगात त्याचा ३० टक्के वाट असून निर्यात ४६ टक्के आहे. ११ कोटी लोकांना थेट रोजगारही या क्षेत्राने दिलेला आहे. देशाच्या विकासात उत्पादन क्षेत्राचा २२ टक्के, कृषी क्षेत्राचा १२ टक्के तर सेवा क्षेत्राचा वाटा ५६ टक्के वाटा आहे. विदर्भाच्या पुढील दहा वर्षाच्या विकासाचा संकल्प करून हा महोत्सव आयोजित केला आहे.

विदर्भात ७५ टक्के मिनरल्स आहे. आर्यन ओर आहे. त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात स्टील उद्योग वाढीला वाव आहे. विदर्भात पाणी, वीज आणि कम्युनिकेशन यंत्रणा सक्षम आहे. विदर्भातील कापूस आणि सूत हा कच्चा माल बांगलादेशात जातो. बांगलादेशात त्यावर प्रक्रिया करून तयार कापडाची विक्री केली जाते. त्यामुळे ते रेडिमेड गारमेंट हब म्हणून नावारूपास आले आहे.

विदर्भातील उद्योजकांनीही या कच्चा मालापासून तयार कापड तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन रेडिमेड गारमेंट क्लस्टर उभारावे आणि स्थानिकांना रोजगार द्यावा हा उद्देश या महोत्सवाचा आहे. विदर्भ ग्रीन हायड्रोजनचे सर्वात मोठे हब व्हावे या उद्देशाने प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी मनपाला सूचना दिलेल्या आहेत.

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात इलेक्ट्रीक वाहने वापरण्यावर भर दिल्यास जंगलातील वाहनांचा आवक कमी होईल आणि वाघासह वाहनांच्या संख्या वाढेल. सोबतच पर्यटकांची संख्याही वाढून स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. खासदार महोत्सवात विदर्भातील सर्वच खासदार आणि लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाणार आहे.

Central Minister Nitin Gadkari
पवारसाहेबांनी अठरापगड जातीतल्या लोकांना संधी दिली म्हणून हा धनंजय मुंडे दिसतोय..

यात विदर्भाच्या सर्वांगिण विकासावर चर्चा करण्यात येणार आहे, असेही गडकरी म्हणाले. पत्रकार परिषदेला खासदार अशोक नेते, एमएसएमई संचालक पी.एम. पार्लेवार, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर उपस्थित होते.

राणे आणि देसाई यांना निमंत्रण

केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम मंत्री नारायण राणे आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनाही या महोत्सवासाठी आमंत्रण दिलेले आहे. याशिवाय इतरही उद्योजक यात सहभागी होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com