Lok Sabha Election: मतदारराजा म्हणतो, अपक्षांचं काही नाही खरं, त्यापेक्षा मग आपलं 'नोटा'च बरं...!

Lok Sabha Election 2024:दहा वर्षांपासून नोटा (None Of The Above ) चा पर्याय आल्यापासून अपक्ष उमेदवारांची पतही घसरत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मागील दोन निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहता अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते पडली आहेत.
NOTA
NOTASarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून विविध पक्षांच्या वरिष्ठांकडे फेऱ्या मारायला सुरुवात केली आहे, तर काही उमेदवारांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु स्वतःची ओळख आणि पक्षाचे अस्तित्व नसतानाही केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपेक्षा NOTA ला मतदान जास्त होत असल्याचं दिसून आलं आहे. दहा वर्षांपासून नोटा (None Of The Above ) चा पर्याय आल्यापासून अपक्ष उमेदवारांची पतही घसरत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मागील दोन निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहता अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते पडली आहेत.

नागपूर लोकसभेची 2014 ची निवडणूक भाजपसाठी (BJP) टर्निंग पॉइंट ठरली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) यांनी विजयाची हॅटट्रिक साधली असताना विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. या निवडणुकीत गडकरी कसे जिंकणार? यापेक्षा त्यांचा पराभव कसा होणार याबाबत जातीपातीची आकडेवारी समोर करून दावे केले जात होते. ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, अनुसूचित जाती यांच्या मतांची गोळाबेरीज करून विलास मुत्तेमवार चौथ्यांदा विजयी होणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, नागपूरच्या (Nagpur) मतदारांनी सर्वांना धक्का दिला आणि सुमारे 2 लाखांच्या मताधिक्यांनी गडकरी विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशाच्या राजकारणात आम आदमी पार्टीचा (Aam Aadmi Party) उदय झाला होता. दिल्लीत आपने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या पक्षाने देशभरात आपले उमेदवार दिले होते. आपने नागपूरमधून अंजली दमानिया यांना उमेदवारी दिली. त्यांना 69 हजार मते मिळाली. या निवडणुकीत एकूण 33 उमेदवार रिंगणात होते. या वेळी नोटाला 3 हजार 460 मते मिळाली तर 4 उमेदवारांचा अपवाद वगळता 29 उमेदवारांना NOTA पेक्षाही कमी मते पडली होती.

NOTA
Lok Sabha Election: 'NOTA'च ठरणार 'किंगमेकर'; खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांचा मतदारराजा उठवणार बाजार

2019 च्या निवडणुकी एकूण 30 उमेदवार रिंगणात होते. एकीकडे नोटाला 4 हजार 578 मते मिळाली, तर दुसरीकडे 26 उमेदवारांची अनामतदेखील जप्त झाली होती. वरील आकडेवारी पाहता नोटाचे महत्त्व वाढत चालले असून, अपक्ष उमेदवारांची पत घसरत चालल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारणी लोकांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून मतदारांनाही आता नोटाला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथून पुढे निवडणुकीत उभं राहताना केवळ पैशाच्या जोरावर त्यांना लोक मतदान करणार नाहीत. हे इच्छुकांनी लक्षात घ्यायला हवं.

R

NOTA
Vishwajit Kadam News: सांगलीसाठी माझा हट्ट अन् आग्रह, तातडीने निर्णय घ्या, विश्वजित कदमांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com