Nagpur MNS News : आयुक्त तुम्ही पाकिस्तानचे आहात का? पाण्यासाठी मनसे आक्रमक !

OCW : ओसीडब्यू या कंपनीसोबत महानगरपालिकेचा कंत्राट झाला होता.
MNS Agitation
MNS AgitationSarkarnama
Published on
Updated on

MNS's Agitation in Nagpur for Water : अवकाळी पावसानंतर दोन दिवस नागपुरात उन्ह कमी झाले होते. पण आता पुन्हा पारा तडकू लागला आहे. अंगाची लाही लाही होत असताना शहराच्या काही भागांत पाणी मिळत नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आज सकाळी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. (Water is not available in some parts of the city)

‘आयुक्त तुम्ही भारताचे आहात, पाकिस्तानचे नाही’, आदी नारे देत मनसैनिकांनी परिसर दुमदुमून टाकला. १८ नोव्हेंबर २०११ ला ओसीडब्यू या कंपनीसोबत महानगरपालिकेचा कंत्राट झाला होता. ५ वर्षात २४ तास पाणी देणार ही कंपनी होती. पण आज १० वर्ष उलटून गेले. २४ तास तर दूरच राहिले, पण गरजेपुरतेही पाणी महानगरपालिका देऊ शकत नाही.

शहरातील काही भाग तर असे आहेत की, १० दिवसांतून एक वेळ टॅंकर येतो, अशी तक्रार शहराध्यक्ष चंदू लांडे यांनी केली. त्या कंपनीला महानगरपालिकेने एक हजार ते १५०० कोटी रुपये देऊन टाकले. ती कंपनी पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरली. महानगरपाकेलिकेच्या आयुक्तांना अधिकार आहेत. ते कंपनीचा कंत्राट रद्द करू शकतात. पण ते तसं करत नाहीत.

अमृत एक, अमृत दोन अशा एक ना अनेक योजना आणून विनाकारण पैसा उधळत आहेत. येवढे करूनही शहराला पाणी मिळाले नाही. यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण आयुक्त भेटतच नाहीत.

MNS Agitation
BRS Meeting at Nagpur: बीआरएसचे पूर्व विदर्भात दमदार पाऊल, नागपुरातील बैठकीत ठरली रणनीती !

गेल्या दीड महिन्यात १० पत्र त्यांना दिले. भेटीसाठी वेळ मागितली. पण अद्यापही त्यांनी भेटायला वेळ दिला नाही. एकाही पत्राचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. वेळ का देऊ शकत नाही, याचेही उत्तर अद्याप आम्हाला मिळालेले नाही. शेवटी आम्ही पोलिस प्रशासनालाही विनंती केली की, त्यांनी मध्यस्थी करावी जेणेकरून हा प्रश्‍न निकाली निघू शकेल. पोलिस प्रशासनानेही काही मदत केली नाही. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही कसोशिने प्रयत्न केले. पण अखेर आज आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला, असे घनश्‍याम निखाडे म्हणाले.

महानगरपालिका (Municipal Corporation) आयुक्तांनी जर भेटण्याची वेळ दिली नाही, तर हे आंदोलन भविष्यात आणखी उग्र करू, असा इशाराही देण्यात आला आहे. आयुक्तांना शांततेच्या मार्गाने आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, ही आमची विनंती आहे. आम्हाला आयुक्त (Commissioner) आजवर येथे दिसलेही नाही. आता आयुक्त हरविले आहेत, अशी जाहिरात तेवढी देणे बाकी आहे. प्रभाग क्रमांक ३५मध्ये १०-१० दिवस पाणी मिळत नाही.

MNS Agitation
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दूरवरील विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागते. हे कदापी सहन करण्यासारखे नाही. टॅंकरमुक्त नागपूर (Nagpur) करण्याची घोषणाही हवेतच विरली. उलट उन्हाळ्यात टॅंकर हे काही लोकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बनतात. त्यामुळे ही कंपनी पोसण्याचे काम सुरू आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात शहराध्यक्ष चंदू लांडे, विशाल बागडे, घनश्‍याम निखाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com