Nagpur MNS News : मारबतपूर्वीच ‘एनआयटी’वर निघणार मनसेचा बडगा, पुराव्यांनिशी करणार पोलखोल !

Raju Umbarkar : मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी मोर्चाची रूपरेषा स्पष्ट केली.
Sandeep Deshpande, Avinash Jadhav and Raju Umbarkar
Sandeep Deshpande, Avinash Jadhav and Raju UmbarkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur MNS Morcha News : नागपूर सुधार प्रन्यासमध्ये (एनआयटी) अधिकाऱ्यांद्वारे सुरू असलेला कथित भ्रष्टाचार व नागरिकांची होत असलेली पिळवणूक याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘मारबत’च्या दोन दिवसांनी बुधवारी (ता. १३) सकाळी १० वाजता नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयावर ‘बडगे’ मोर्चा काढण्यात येणार आहे. (MNS leader Raju Umbarkar explained the outline of the march)

या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजू उंबरकर करणार आहेत. या मोर्चात नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लागेबांध्यांची पोलखोल पुराव्यांनिशी करण्यात येणार असल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांनी काल (ता. नऊ) पत्रकार परिषदेत सांगितले. नासुप्रमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी मोठ्या संख्येने बडगे मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

पत्रकार परिषदेत मनसेचे (MNS) नेते राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी मोर्चाची रूपरेषा स्पष्ट केली. मनसेच्या प्रमुख मागण्यांमध्ये आर्थिक दुर्बल गटातील राखीव अभिन्यासात अतिक्रमणकारी यांना भूखंड वाटपाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अतिक्रमणकारी यांना भूखंडाचे वाटप करण्यात यावे, काळ्या यादीतील कंत्राटदारांना विकासकामांचे अवैध वाटप व निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी.

ईआयएएस योजना मौजा चिखली (देव) येथील औद्योगिक वापराच्या भूखंडावर अवैधरीत्या सुरू असलेला व्यावसायिक वापर व अनधिकृत गोदामधारकासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे साटेलोटे याची चौकशी करण्यात यावी, मौजा वाठोडा येथील गिड्डोबा मंदिर ते पुरस्कार लॉनपर्यंत प्रलंबित १८ मीटर रुंद रस्त्याची जोडणी करावी, गुंठेवारीअंतर्गत काढलेले २६ एप्रिल २०२३ चे परिपत्रक रद्द करावे, या मागण्या करण्यात येणार आहेत.

Sandeep Deshpande, Avinash Jadhav and Raju Umbarkar
MNS दहीहंडी LIVE । राज ठाकरे येताच नुसता कल्ला आणि शिट्ट्यांचा पाऊस । Raj Thackeray

याशिवाय डिप्टी सिग्नल, पँथरनगर झोपडपट्टी धारकांना तत्काळ पट्टेवाटप करण्यात यावे, विहित मुदतीत बांधकाम न केलेले व विसंगत वापर सुरू असलेले भूखंड वाटप तत्काळ रद्द करण्यात यावे, यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे, शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उतखेडे, दक्षिण विभाग अध्यक्ष अंकित झाडे यांच्यासह गौरव पुरी, चेतन बोरकुटे आदी उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com