Bharat Jodo Ground : काँग्रेसचा 139वा स्थापना दिन गुरुवारी (ता. 28) नागपुरातील महारॅलीच्या माध्यमातून साजरा होत आहे. या रॅलीतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. ‘है तयार हम’ असे नाव या महारॅलीला देण्यात आले आहे. महारॅलीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनर्सच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता भाजपला लक्ष्य केले आहे.
देशभरातील काँग्रेसचे नेते महारॅलीसाठी नागपुरात आले आहेत. सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर कॉंग्रेसचे मोठे पोस्टर-बॅनर्स लागले आहेत. शहरात लावण्यात आलेले हे बॅनर्स नागपूर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करीत काढण्यात आलेत. बॅनर्सच्या विषयावरून काँग्रेस नागपुरात आक्रमक झाली आहे. नेत्यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नागपूरमध्ये होणारी काँग्रेसची महारॅली याच तयारीचा एक भाग आहे. महारॅलीसाठी देशभरातील काँग्रेस नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी हे देखील नागपुरात आले आहेत. काँग्रेसकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहेत. यासाठी नागपुरात मोठ्या प्रमाणात स्वागताचे बॅनर्स उभारण्यात आले आहेत. सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा हे बॅनर्स दिसतात.
या बॅनर्सवर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र आहे. यापैकी अनेक बॅनर्स कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आल्याचा ठपका ठेवत नागपूर महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेले सिग्नल्स, विजेचे खांब आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी हे बॅनर्स उभारण्यात आले होते. काढण्यात आलेले अनेक बॅनर्स विनापरवाना होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील अवैध होर्डिंग्स व बॅनर काढण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. कोणतीही परवानगी न घेता बॅनर लावण्यात आले होते. उच्च न्यायालयाचे बॅनर्स व होर्डिंग्सबाबत आदेश आहेत. त्यानुसार कारवाई करीत असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूर शहरात दखल झाले आहेत. देशभर या सभेचे राजकीय पडसाद उमटणार आहेत. जनतेचा आवाज या सभेद्वारे केंद्र सरकारच्या विरोधात एकवटणार आहे. याची धास्ती घेत पळपुट्या भाजपने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून शहरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले सभेचे बॅनर्स काढण्याचा सपाटा लावल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.