Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

Nagpur Nitesh Rane News : ‘माजी आमदार’ अशी पाटी लावण्याची वेळ येऊ नये, नितेश राणेंचा टोला कुणाला?

Rohit Pawar : रोहित पवार हे ‘सीनियर केजी’मध्ये आहेत.

Nagpur Political News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक्सपर्ट कायदे तज्ज्ञ आहेत. त्यांनी कायदा शिकवलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणी कायदा शिकवण्याची गरज नाही. उशीर होत आहे म्हणत खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका करत होते. आज त्यांच्यासोबत जाऊन बसावं लागत आहे. आमचे सरकार २०२४ पर्यंत टिकणार आहे, असा विश्‍वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Rohit Pawar is in 'Senior KG'.)

आमदार राणे आज (ता. १४) नागपुरात दाखल झाले असता, पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्याबाबत विचारले असता, रोहित पवार हे ‘सीनियर केजी’मध्ये आहेत. अद्याप ते शाळेतही पोहोचले नाहीत. त्यांना कंठ फुटलेला नाही. आत्ता कुठे ते अंड्याच्या बाहेर पडलेले आहेत.

अगोदर अनुभव घ्यावा, प्रणिती शिंदे काय बोलल्या, त्यावर लक्ष घालावं. असं काही तरी बोलत फिरण्यापेक्षा थोडं कर्जतमध्ये लक्ष घालावं, जेणेकरून माजी आमदार ही पाटी लावण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. त्याबद्दल विचारले असता, त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. समाजाचं हित हे जरांगे पाटलांना माहीत आहे. सरकारसोबत चर्चा करून समाजाचा फायदा होईल. त्या बाबतीत ते विचार करतील.

महाराष्ट्राचे (Maharashtra) वातावरण अस्थिर करणाऱ्यांच्या हातात आपण काही गोष्टी देऊ नये. एकत्र मिळून मुख्यमंत्री (Chief Minister) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवावा. कुठल्याही समाजाला कुठलीच अडचण होणार नाही. ते न्याय देतील. हिंसक आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार, उबाठाचे लोक त्यामागे आहेत. याचे पुरावे मिळतील. जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला.

आरक्षण घालवणार संजय राजाराम राऊतच मालक आहे. त्यांच्याच मुखपत्रात मुका मोर्चाचे कार्टून छापणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मराठा समाजाच्या मोर्चात राऊत यांना बोलायला पण दिले नाही. चुकून माईक दिला असता तर कुठं घातला असता, हे कळलं पण नसतं, अशा शब्दांत राणेंनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

Nitesh Rane
#shorts : "राऊतांना कपडे घालून फिरू देणार नाही" | Nitesh Rane On Sanjay Raut | Manoj Jarange |

मागील सरकार हे पाटणकर सरकार होते. हे उद्धव ठाकरे सरकार नव्हते. ज्या दिवशी पाटणकर काढा निघेल, त्या दिवशी ते मातोश्री बाहेर पडणार नाहीत. एवढी काळजी स्वतःच्या आमदारांची घेतली असती तर ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरे जितकी खालची पातळी गाठून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील. त्याच्याही खालच्या पातळीवर नितेश राणे उभा आहे.

उद्धव ठाकरेला दिवसा तारे दाखवण्याची तयारी आमची आहे. ३९ वर्षे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिल्याने त्यांची संपूर्ण कुंडली आम्हाला माहिती आहे. तो किती बसतो, हे सगळं माहिती आहे. जास्त बडबड करू नये. रोज कपडे फाडू शकतो एवढी माहिती आमच्याकडे आहे, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना कडक इशारा दिला.

सनातन धर्मावर टीका करणाऱ्या डीएमकेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत घेतला गेला. सनातन धर्मावर टीका करणाऱ्या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील, तर ‘इंडिया’ ऑनलाइन कशासाठी बनला आहे, हे आता स्पष्ट होत आहे. हे सनातन आणि हिंदू धर्म विरोधात लढण्यासाठी संपवण्यासाठी हे अलायन्स तयार झाले आहे, असे चित्र आता स्पष्ट होत असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Nitesh Rane
Nitesh Rane यांचे वादग्रस्त विधान, बघा काय म्हणाले ? |Uddhav Thackeray |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com