Nagpur : नागपूरातील ‘तो’ फलक नाना पटोलेंना दाखवतो वाकुल्या !

Nago Ganar : गाणारांच्या पराभवाने भाजपला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले.
Satyajit Tambe's Board for Nana Patole
Satyajit Tambe's Board for Nana PatoleSarkarnama

Satyajeet Tambe's Board for Nana Patole : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल भाजपसाठी धक्कादायक लागले. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती नागपूर शिक्षक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची. नागपुरात कॉंग्रेसचे सुधाकर अडबाले यांनी नागो गाणार यांना पराभूत करीत भाजपला जबर धक्का दिला.

दोन वर्षापूर्वी झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांनी माजी महापौर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर गाणारांच्या पराभवाने भाजपला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. इकडे कॉंग्रेस विजयाची घोडदौड करीत असताना नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसला घरातूनच फटाके लागले. कॉंग्रेसचे खंदे समर्थक सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत पक्षाला धक्का दिला.

निकाल लागले आणि नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. यावेळी तांबेंनी विजयाचा जल्लोष केला नाही. कारण निवडणुकीदरम्यान त्यांचा निकटम समर्थक अपघातात मरण पावला होता. त्यामुळे कुणीही जल्लोष करू नये, अशा सूचना त्यांनी समर्थकांना देऊन ठेवल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी नागपूरच्या विमानतळावर एक फलक लागला आणि आजही हा फलक नाना पटोले यांना वाकुल्या दाखवीत आहे.

‘जीत सत्याची.. सुरुवात नव्या पर्वाची… आमदार सत्यजीत तांबे - नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! शुभेच्छुक - सत्यजीत तांबे मित्र परिवार नागपूर’, असा मजकूर असलेला सत्यजीत तांबे यांचा फोटो असलेला हा फलक नागपूर विमानतळावर लागलेला आहे. सत्यजीत तांबे नाशिक मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेथे त्यांनी विजयाचा जल्लोश केला नाही की साधी रॅलीसुद्धा काढली नाही.

Satyajit Tambe's Board for Nana Patole
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर आरोप; 'थोरातांनी आता बोललं पाहिजे : 'काय घडले हे फक्त...'

नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) सत्यजीत तांबे यांच्या अभिनंदनाचा फलक केवळ आणि केवळ नाना पटोले (Nana Patole) यांना दाखवण्यासाठी लावला, अशी चर्चा सुरू आहे. नाही तर तांबे निवडून आले नाशिकमधून आणि फलक नागपूरमध्ये कशाला हवा, अशी चर्चा खुद्द कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात आहे.

सत्यजीत तांबेंच्या (Satyajit Tambe) उमेदवारीला नाना पटोले यांनी विरोध केला होता आणि त्यांच्या नाकावर टिच्चून अपक्ष निवडणूक लढवीत सत्यजीत निवडून आले. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांनी नाना पटोलेंच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी म्हणून हा फलक नागपूर विमानतळावर लावला, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com