Nagpur ZP News : सभापतींनी फर्निचर घरी नेल्याचे प्रकरण : चर्चा न होऊ देण्यासाठी कुणी केले प्रयत्न ?

ZP : फर्निचरचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला.
Nagpur ZP
Nagpur ZPSarkarnama
Published on
Updated on

There was a lot of back-and-forth discussion on this in the Zilla Parishad : फर्निचरचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. या मुद्यावर चांगली चर्चा व्हावी, अशी अपेक्षा काही सदस्यांची होती. परंतु विरोधकांकडून त्यावर फारशी चर्चा न झाल्याने सत्ताधारी सदस्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती होती. (A speaker brought back the furniture)

फर्निचरचा मुद्दा नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चर्चेला आहे. दोन माजी सभापतींनी शासकीय निवासस्थानांमधून फर्निचर घेऊन गेल्याचा मुद्दा विरोधी पक्षाकडून स्थायी समितीमध्ये उपस्थित करण्यात आला होता. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान एका सभापतींनी फर्निचर परत आणले. दुसऱ्या सभापतीने जे फर्निचर दिले ते कमी दर्जाचे असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला.

जिल्हा परिषदेत यावरून चांगलीच उलटसुलट चर्चा झाली. संबंधित माजी सभापतीने नातेवाइकांस फर्निचर दिल्याची जोरदार चर्चा होती. यावरून चांगलेच राजकारण (Politics) तापले. सत्ताधाऱ्यांच्या पार्टी मिटिंगमध्येही यावर चर्चा झाली. संबंधित सभापतींनी ते परत करण्याची ग्वाही बैठकीत दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विरोधी पक्षालाही आश्वस्त करण्यात आले. त्यामुळे प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

फर्निचर परत न आल्याने एका सभापतीने निवासस्थानाचा ताबा घेतला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात सत्ताधाऱ्यांमधीलच वाद चव्हाट्यावर आले. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा नव्याने समोर आणण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी मुद्दा हवा होता. विरोधकांना आयता मुद्दा मुळाला. सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या सदस्याकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

Nagpur ZP
Nagpur ZP News : शासकीय निवासस्थानातील फर्निचर नेले घरी; ‘त्या’ माजी सभापती पुन्हा झाल्या टारगेट !

विभाग प्रमुखांकडून माजी शिक्षण व वित्त समिती सभापती आणि माजी महिला व बाल कल्याण समिती सभापतींनी फर्निचर नेले आणि परत केल्याची माहिती देण्यात आली. यावर चर्चेची मागणी होत असतानाच विरोधी पक्षाच्या घटक पक्षाकडून संबंधित विषय संपवण्याची भाषा झाली आणि चर्चा झालीच नाही. यामुळे चर्चा हवी असलेल्या सत्ताधाऱ्यांमधील काहींचा हिरमोड झाला. तर चर्चा न झाल्याने माजी सभापतींना खुशी झाल्याची चर्चा आहे. या विषयावर चर्चा होऊ, नये यासाठी काहींनी प्रयत्न केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या (ZP) वर्तुळात होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com