आमचे दुकान बंद पाडण्याच्या नादात नाना स्वतःचेच दुकान बंद करून बसले…

महाविकास आघाडीत सहभागी असतानाही विधानपरिषदेच्या दोन जागा गमावल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनी कॉंग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला आहे.
Pravin Kunte Patil and Nana patole

Pravin Kunte Patil and Nana patole

Sarkarnama

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील आमचे दुकान बंद करायला निघाले होते, पण आता विदर्भात त्यांचे स्वतःचेच दुकान बंद पडले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे (Pravin Kute Patil) पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भात एकच दुकान आहे आणि तेसुद्धा लवकरच बंद पडणार आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी मागील काळात बुलडाण्यात केले होते. त्यानंतर त्यावर राज्यभर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तेव्हाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोलेंचा चांगलाच समाचार घेतला होता. आता विदर्भात महाविकास आघाडीत सहभागी असतानाही विधानपरिषदेच्या दोन जागा गमावल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते कुंटे पाटील यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

नाना पटोलेंनी नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐन वेळेवर उमेदवार बदलवल्यामुळे त्यांची स्ट्रॅटीजी फसली आणि ते तोंडघशी पडले. या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली. त्याला प्रदेश काँग्रेस नेतृत्वाची वैचारिक दिवाळखोरी आणि नियोजन व समन्वयाचा अभाव असल्याचेही सांगितले जाते. पैशाचा प्रचंड वापर करून केलेला घोडेबाजार, यामुळेच नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, असेही कुंटे पाटील म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Pravin Kunte Patil and Nana patole</p></div>
देशात सहा राज्यांकडेच विधान परिषद! पण राजकीय पक्षांनी वाढवले महत्व

नागपूर, अकोला निवडणुकीत आघाडीची 96 मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबईत, धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर यापेक्षाही जास्त नाचक्की कॉंग्रेसची झाली असती. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल ३६२ मते घेऊन बावनकुळे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीची तब्बल ४४ मते फोडली आहेत. कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना केवळ १ मत मिळाले तर कॉंग्रेस पुरस्कृत म॔गेश देशमुख यांना १८६ मत मिळाली.

अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली आहे. त्यांना 443 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना 334 एवढी मते मिळाली. भाजपकडे असलेली स्वत:ची हक्काची मतं पाहता महाविकास आघाडी फोडत हा चमत्कार घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयाची हॅट्ट्रीक केलेले गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला आणि महाविकास आघाडीलाही चांगलाच धक्का बसला आहे. आता तरी नाना पटोले यांनी स्वतःच्या दुकानाची काळजी करावी, असा सल्लाही प्रवीण कुंटे पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com