Nana On BJP : नानांचा भाजपवर हल्ला; म्हणाले, आता भाजपकडून राम मंदिरालाही धोका!

Vijaykumar Gavit : नाना पटोले यांनी विजय गावीतांवर गंभीर आरोप केले आहेत.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Bhandara Political News : काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप करत टीकास्त्र सोडले आहे. नाना पटोले म्हणाले की, निवडणुका येताच त्यापूर्वी भाजप काही ना काही प्रकरण उकरून नाहीतर घडवून आणत असते. (Nana Patole has made serious allegations against Vijay Gavit)

भंडाऱ्यात काल (ता. १५) आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त म्हणाले, निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये (Gujrat) ज्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमानांमध्ये दंगली घडवून आणल्या. गोध्राकांड घडविण्यात आले, पुलवामा हल्लाही घडवून आणला. त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराचा वापर होऊ शकतो.

राम मंदिरालाही आता धोका निर्माण होऊ शकतो, असे स्फोटक विधान नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांना लष्कराची सुरक्षा द्या, असे सत्यपाल मलिक आच म्हणाले. त्यामुळे आता भाजपकडून (BJP) राम मंदिरालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपकडे असे अनेक विजय गावीत...

नाना पटोले यांनी विजय गावीतांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने जनतेच्या पैशाची लूट माजविली आहे. जनतेच्या योजनाचे पैसे आपल्या घरात कसे भरता येतील, हे भाजपकडून शिकावं. भाजपकडे एक नव्हे तर असे अनेक विजय गावीत आहेत, जे जनतेचे पैसे लुटण्याचे काम करीत आहेत. विजय गावीत तर हा लहान मासा आहे, कोट्यवधींची लूट करणारे भाजपमध्ये अनेक आहेत, अशी सडकून टीका नाना पटोले यांनी केली.

बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप

बेरोजगारांच्या प्रश्नांवर नानांनी सरकारला घेरले आहे. नाना म्हणाले की, आता शासकीय नोकऱ्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिले जात आहे. दरम्यान, खासगी कंपनी पैसे कमवण्यासाठी बेरोजगार तरुण-तरुणींकडून परीक्षा शुल्काच्या नावावर अधिकचे पैसे वसूल करून बेरोजगार तरुण-तरुणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप करीत आहे. सरकारने याची गंभीर दखल न घेतल्यास याचे परिणाम सरकारला लवकरच भोगावे लागतील.

Edited By : Atul Mehere

Nana Patole
Nana Patole News : गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप भाजपने केले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com