Nana Patole : महायुती सरकार सत्तापिपासू अन् बेअक्कल; नाना पटोलेंचा वर्मी घाव

Mahayuti Vs MVA : लोकसभा निवडणुकीत लोकांनी जागा दाखवून दिल्यानेच महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Gondia Political News : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. त्यातील महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरकारकडून मोठा गवगावा सुरू आहे.

मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे धूळफेक असल्याचे म्हणत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हे सरकार सत्तापिपासू आणि अक्कल नसलेले असल्याचे म्हणाले.

नाना पटोले Nana Potole म्हणाले, लोकसभा निवडणुकीत लोकांनी जागा दाखवून दिल्यानेच महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पाच गॅरंटी दिल्या होत्या, त्यातच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी या योजनेचा समावेश होता. आता राज्याने आमच्याच योजनेची नक्कल केली. पण नक्कल करायलाही अक्कल लागते. ती अक्कल या महायुतीच्या सरकारमध्ये नाहीच, असा हल्लाबोलही पटोलेंनी केला.

महायुती सरकारने आता राज्यात होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घाईगडबडीत लागू केली आहे. दरम्यान, यापूर्वीच मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून सरकारने भगिनींचे आर्थिक नुकसान केले. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर सरकारला बहि‍णींची आठवण आली. त्यातूनच योजनेच्या माध्यमातून महिलांना दिलासा देण्याचा केविलवाणा प्रयत्न या सत्तापिपासू सरकाने केला, असा शब्दांत पटोलेंनी शिंदे सरकारचा समाचार घेतला.

Nana Patole
Prakash Ambedkar : 'कोण दलितांसाठी लढतंय ते ओळखा', दुरावलेली मतपेढी परत मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर 'अ‍ॅक्शन मोड'वर

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेवराव किरसान या दोन खासदारांचा गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे रविवारी जाहीर सत्काराचे आयोजन केले होते. त्याच कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश होणार होता. त्याला जाण्यापूर्वीच पटोलेंनी सरकारच्या योजानांचे वाभाडे काढले.

(Edited by Sunil Dhumal)

Nana Patole
Bjp News : भाजपचा प्लॅन ठरला; विधानपरिषदेला दोन वर्षानंतर मिळणार सभापती; 'या' नेत्याची वर्णी लागणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com