BJP News : भाजपचा प्लॅन ठरला; विधानपरिषदेला दोन वर्षानंतर मिळणार सभापती; 'या' नेत्याची वर्णी लागणार ?

Political News : विधानसभा निवडणुकीत जर राज्यातील सत्ता गेली तर काय करायचे याबाबत भाजपने रणनीती आखली आहे. त्यानुसार त्यांनी आता रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदावर भाजप नेत्याला बसविण्याचा प्लॅन तयार ठेवला आहे.
Pravin Darekar, Ram Shinde, niranjan davkhare
Pravin Darekar, Ram Shinde, niranjan davkhare Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे भाजप आता ताकही फुंकून पित आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काय होणार या चिंतेने ग्रासले आहे.

विधानसभा निवडणुकीत जर राज्यातील सत्ता गेली तर काय करायचे याबाबत भाजपने रणनीती आखली आहे. त्यानुसार त्यांनी आता रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदावर भाजप नेत्याला बसविण्याचा प्लॅन तयार ठेवला आहे.

येत्या काळात जर राज्यातील सत्ता गेली तर विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात कंट्रोल कायम राहवा, अशी रणनीती भाजपने आखली आहे. येत्या दोन दिवसांत विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर करण्याचा प्लॅन असून त्या पदासाठी भाजपमधील माजी मंत्री राम शिंदे, प्रविण दरेकर आणि निरंजन डावखरे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचा सभापतीपदाची निवडणूक घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. येत्या काळात सत्ता कायम राहील की नाही, याबद्दल कॉन्फीडन्स नसल्याने भाजपने विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी कारली असल्याचे समजते.

आता विधानसभा निवडणुकीनंतरच पुढील अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच सभापती बसवण्याचा भाजपचा (Bjp) प्रयत्न असणार आहे. त्यासाठी मंगळवारी किंवा बुधवारी विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या निवडणुकीबाबत दोन-तीन दिवस आधी माहिती सभागृहाला द्यावी लागते, त्यामुळे ती सोमवारी देतील असे वाटते. तीन दिवसांपूर्वी ही माहिती देणं अपेक्षित असतं. त्यामुळे 11 किंवा 12 जुलैला सभापती पदाची निवडणूक होईल, असा अंदाज अधिकाऱ्याने वर्तवला आहे.

Pravin Darekar, Ram Shinde, niranjan davkhare
Uddhav Thackeray News : जरांगे, हाकेंच्या जीवाशी खेळ का करताय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

या निवडणुकीत भाजपला महायुतीमधील कोणत्याच घटक पक्षाचा विरोध होणार नाही. त्यामुळे कोणीही भाजपच्या उमेदवाराला विरोध करणार नाही. राम शिंदे पुढील सभापती असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ते धनगर समाजाचे आहेत.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचा सभापती पदाचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला. ते निवृत्त झाले. पण त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा परिषदेवर पाठवले होते. ते निवडून आले.

सभागृहाचे सभापतीपद 8 जुलै 2022 पासून रिक्त आहे. त्यातच आता अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी सभापतीपदाची निवडणूक घेण्याची मागणी लावून धरली असल्याचे समजते. त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Pravin Darekar, Ram Shinde, niranjan davkhare
Eknath Shinde News : जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत दिसेल; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com