Nagpur Politics : आता नानांची सटकली; म्हणाले, 'पाशवी बहुमताचे...'

Nana Patole : लोकशाहीची पायमल्ली केली जात असल्याची नाना पटोलेंची नागपुरात टीका
Nana Patole on Maharashtra Government.
Nana Patole on Maharashtra Government.Sarkarnama
Published on
Updated on

Congress On BJP : राज्यातील सत्ताधारी महायुतीचे सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर लोकांचा आवाज दडपत आहे. हाच प्रकार केंद्रातील भाजपनेही चालविला आहे. महाराष्ट्रात अनेक ज्वलंत प्रश्न असतानाही सरकारने हिवाळी अधिवेशना चर्चा केली नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशनही यापेक्षा वेगळे नव्हते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.

सोमवारी (ता. 25) नागपूर येथील पत्रकार परिषदेत पटोले यांनी दोन्ही सरकारवर सडकून टीका केली. आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, प्रवक्ता अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते. सोनिया गांधी यांना दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती. परंतु विरोधकांनी देश तुटेल, अशी भीती विनाकारण दाखविली, असा आरोप पटोले यांनी केला.

Nana Patole on Maharashtra Government.
Nagpur News : ललित पाटील प्रकरणानंतर सुनील केदारांबाबत आरोग्य विभागाचे सावध पाऊल

लोकशाहीत विरोधकांच्या टीकेचा सन्मान करणे गरजेचे असते. काँग्रेस पक्षाने नेहमीच हा सन्मान केला आहे. मात्र भाजपला लोकशाहीच मान्य नाही. त्यामुळे ते विरोधकांच्या कोणत्याही भावनांचा विचार करीत नाही, असे ते म्हणाले. सोनिया गांधी यांच्या विरोधात विनाकारण प्रक्षोभक वक्तव्य करीत भाजपने भारतीयांची दिशाभूल केली. परंतु सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा देशासाठी त्याग केला, असेही पटोले म्हणाले.

‘इंडिया’ आघाडी देशाच्या हितासाठी एकत्र आली आहे. त्यामुळे आघाडीत जो निर्णय होईल, तो सर्वांना मान्य असेल. काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे जात असल्याचा अहवाल सर्वेक्षणात आला आहे. ईव्हीएमबाबत जर मतदारांमध्ये शंका असेल तर मतपत्रिकेवर मतदान घेतले पाहिजे, अशी सर्वांची मागणी आहे. त्यावर निवडणूक आयोगाने विचार करायला हवा. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमला विरोध केला होता. आता तेच या यंत्राचे कौतुक करीत असल्याची टीका पटोले यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र मोदी यांना जनतेचा आवाज ऐकायचा नाही. त्यांना केवळ ‘मन की बात’ ऐकवण्यातच स्वारस्य आहे. जातनिहाय जनगणनेचा काँग्रेसने सुरुवातीपासूनच पुरस्कार केला आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला ही जनगणना नको आहे. आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर अशी जनगणना गरजेची असल्याचे पटोले यांनी अधोरेखित केले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपले हित साधायचे आहे. त्यांना आरक्षण कायमचे संपवायचे आहे, त्यामुळेच ते जातनिहाय जनगणनेला विरोध करीत असल्याचे ते म्हणाले.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कोणताही अर्थ उरलेला नाही. केवळ नियमात आहे यासाठी महायुतीच्या सरकारने नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले. दहा दिवसांच्या अधिवेशनात कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या रकमेएवढ्या पुरवणी मागण्या जर करण्यात येत असतील, तर सरकारच्या तिजोरीची परिस्थिती काय असेल, असा सवालही पटोले यांनी केला.

Edited by : Prasannaa Jakate

Nana Patole on Maharashtra Government.
Nagpur News : आमदारकी रद्दच्या निर्णयावरून नाना पटोलेंची तीव्र नाराजी, म्हणाले विधिमंडळाला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com