'दादापेक्षा नाना मोठा' पटोलेंची जोरदार टोलेबाजी

भाजपने प्रत्येक राज्यात किरीट सोमय्या यांच्यासारखी उपद्रवी माणसे पेरली आहेत.
Nana Patole
Nana Patolesarkarnama

अकोला : अकोला (Akola) जिल्हातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी उभे असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी एका सभेमध्ये बोलताना त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

Nana Patole
जयंत पाटलांची मोठी घोषणा : राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त

यावेळी पटोले म्हणाले, आपल्या मी नाना पटोले आहे. मी जे बोलतो ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. दादापेक्षा नाना मोठा असतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

यावेळी पटोले म्हणाले, महापालिकेसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या विषयावर काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही ठराव घेऊन द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत सरकारला विनंती केली आहे आणि तसा बदल होईल अशी आम्हाला खात्री असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
'नागवडे उसाच्या वजनात काटा मारून कुटुंबातील व्यक्तींच्या नावे पैसे काढतात'

यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, केंद्र सरकार हे शेतकरी, कामगा आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळेच हे सर्व अपयश झाकण्यासाठी भाजपने प्रत्येक राज्यात किरीट सोमय्या यांच्यासारखी उपद्रवी माणसे पेरली आहेत. सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिताच सोमय्यांचा ढालीसारखा वापर केला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. सोमय्यांना समोर करुन भाजपने खालच्या पतळीवरचे राजकारण केले, असल्याचेही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com