Nana Patole News: नाना पटोले म्हणाले, पुढचा आठवडा राज्यातील घडामोडींसाठी महत्वाचा; कारण...

Sharad Pawar News: बैठकीत पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आलेला आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Congress State President Nana Patole on Maharashtra's situation : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. या बैठकीत पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष सुरू केला. (Activists started a jubilation by bursting firecrackers)

यासंदर्भात आज (ता. ५ मे) नाना पटोले यांना विचारले असता, आम्ही त्यांचा बैठकीकडे आम्ही लक्ष ठेवून होतो, असे त्यांनी सांगितले. पुढचा आठवडा राज्यातील घडामोडीसाठी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.पण सध्या मी त्यावर बोलणार नाही, असे सांगून या विषयातील गूढ अधिक वाढवले.

कर्नाटकमध्ये निवडणुकीदरम्यान भाजपने जी भूमिका घेतली आहे, त्यावर आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवलेला आहे. पण धर्माच्या नावावर लुटपाट संघटना नसाव्या. संस्था आणि देव यांतील फरक पंतप्रधानांना कळत नसेल, तर हे देशाचे दुर्भाग्य आहे, बजरंगबलीच्या उपासकाची नियुक्ती करणे, तेवढे सध्या शिल्लक आहे, असे सांगताना तिकडे काहीही नौटंकी असू द्या, पण आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहे, असे पटोले म्हणाले.

मी पुन्हा येईन, असे म्हणणारे पुन्हा आले; पण उपमुख्यमंत्री बनून आले, असे म्हणत पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला हाणला. माझ्यासारखा कार्यकर्ता असता तर ‘मी असा आलोच नसतो’. भाजप पुन्हा तरी सत्तेत तरी येईल का ते त्यांनी बघावे. ते काय बोलतात, आजकाल कळत नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आणि फडणवीसांवर टिका केली.

Nana Patole
Nana Patole :राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पुरोगामी विचारधारेला धरुन चालेल |Congress | NCP |Sarkarnama

पुणे जिल्ह्यातील कसब्यात जनतेने काँग्रेसला आशीर्वाद दिला. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा काँग्रेसने जिंकल्या आहे. सध्याची परिस्थिती आणि जनतेचा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेत येणार, हे नक्की. असे असले तरी आम्ही नुसतेच अवलंबून राहणार नाही. आमचे नेते, कार्यकर्ते संघर्ष करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही कॉंग्रेसला यश मिळेल, असा विश्‍वास पटोलेंनी व्यक्त केला.

धर्माच्या नावावर कुणी गुंडागर्दी करत असेल, तर त्याला अजिबात मान्यता नाही. धर्माचा नावावर आम्ही राजकारण (Politics) करत नाही आणि भाजपकडे जनतेला सांगण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे ते प्रत्येक निवडणुकीत धर्माचा आधार घेतात. पण लोक हुशार झाले आहेत.

Nana Patole
Nana Patole यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल | Congress | Modi Sarkar | Sarkarnama

धर्माच्या नावावर जनतेला जास्त काळ मूर्ख बनवता येत नाही, हेसुद्धा भाजपच्या (BJP) लवकरच लक्षात येईल. त्यानंतर त्यांच्याकडे पर्याय उरणार नाहीत, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. महानगरपालिका, (Municipal Corporation) लोकसभा व विधानसभा पुन्हा जिंकून आणण्याचा प्लॅन तयार असल्याचेही पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com