Nana Patole News : सुरजागडमधील अवैध उत्खननाला सरकारचाच पाठिंबा, पटोलेंचा गंभीर आरोप !

Maharashtra : तोपर्यंत जनतेने कोणाच्या भडकवण्याला बळी पडू नये.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole made the allegation on Government : महाराष्‍ट्रात घडत असलेल्या घटना पाहता जाती-जातीच्या विरोधात वातावरण पेटवले जात आहे. हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. यामागील खरा चेहरा जोपर्यंत पुढे येत नाही, तोपर्यंत जनतेने कोणाच्या भडकवण्याला बळी पडू नये. पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. सरकार राज्याचं असो की केंद्रातलं मूळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष भरकटवण्याचे काम चाललेले आहे, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला. (There is a lot of pressure on the police)

आज (ता, ८) सकाळी नागपुरात पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या दंगलींच्या परिस्थितीत संयम आणि शांतता ठेवणे फार गरजेचे आहे. शांतता हाच याच्यातील मार्ग आहे. सोशल मीडियाववर सक्रिय असणाऱ्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन कॉंग्रेसचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्यांनी मी करतो.

सुरजागड असो की अन्य कुठल्याही खाणी आम्ही सातत्याने अवैध उत्खननाला विरोध केला आहे. पण सुरजागड येथे अवैध उत्खननाला केंद्र आणि राज्य सरकारचा पाठिंबा आहे. न्यायालयाने या विरोधात सरकारला उत्तर मागितले आहे. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर जनतेला न्याय मिळेल अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय रोवू पाहात आहे. यासंदर्भात विचारले असता, नवीन दुकान उघडले की दुकानात काही लोक जाणारच आहेत. पण महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्ये आहे. या महाराष्ट्रामध्ये असे कुठले राजकीय पक्ष आले तर त्या पक्षांना संधी नाही. या महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीचे सरकार बनेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Nana Patole
Nana Patole; माझी भुमिका स्पष्ट आहे | Congress | Sarkarnama Video |

सत्तांतराच्या संदर्भात विचारले असता, विधानसभा अध्यक्षांचे ते अधिकार आहेत. आता ते क्रांतिकारी निर्णय कोणता घेतात, शेड्युल १०च्या वर जाऊन घेतात का, हा प्रश्न निर्माण होतो. त्यांना निर्णय शेड्युलच्या आधारावरच निर्णय घ्यावा लागणार आहे, त्यामुळे शेड्युल त्यांच्यावर जर गेला तर तो क्रांतिकारी होऊ शकतो. मात्र अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले (Nana Patole) यांना हटवण्याच्या हालचाली कॉंग्रेसमधील (Congress) काही नेत्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली. आता नाना पटोले यांच्या समर्थकांनी खरगे यांची (Mallikarjun Kharge) भेट घेतली आहे. याबाबत विचारले असता, हे विषय चालूच राहणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com