Nana Patole News : संजय राऊतांनी चोमडेगिरी बंद करावी, ते आमचे प्रवक्ते नाहीत !

Sharad Pawar : शरद पवार यांनी पुस्तकात काँग्रेसवर केलेल्या टिकेवरही सध्या बोलणार नाही.
Nana Patole and Sanjay Raut
Nana Patole and Sanjay RautSarkarnama

Nana Patole Criticize Sanjay Raut : महाविकास आघाडी होत असताना कोण कशा पद्धतीने वागत होते, हे आत्ताच सांगणार नाही, शरद पवार यांनी पुस्तकात काँग्रेसवर केलेल्या टिकेवरही सध्या बोलणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. (The country was watching when the early morning government fell)

आज (ता. ३ मे) सकाळी नाना पटोले नागपुरात बोलत होते. ते म्हणाले, पहाटेचं सरकार पडल्यावर देश बघत होता. आम्ही यांच्या सत्तेच्या वाटेत नव्हतोच. पहाटेच्या नाही अन् आणि कुठल्याच नियोजनात आम्ही नव्हतो. तर कॉंग्रेसकडून कॉमन मिनीमम प्रोग्राम तयार करण्यात आला होता. सोनिया गांधी यांनी सांगितलं होतं की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपलं नको. आता या विषयावर अधिक बोलणार नाही. वेळ आल्यावर सविस्तर बोलेन.

आमच्या पक्षात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, तर ते लोक आमच्याकडे आले होते. सोनिया गांधी यांच्याकडे आले होते, त्यामुळं कोणाच्या मध्यस्थी ने तेव्हा सरकार झाले, हेही सर्वांना ठाऊक आहे. तेव्हा आम्ही केवळ सत्तेसाठी नव्हतो. पहाटेचे सरकार आले. राज्याला कलंक लावण्याचं काम झालं. हे महाराष्ट्राने बघितलं, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा कुणाचा होता, पहाटेच सरकार कुणाचं होतं, हेही सर्वांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे बोट दाखवलं.

पवारांचा राजीनामा हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यावर काही बोलावं असं वाटत नाही, जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा त्याच्याशीच काय ते बोलेन. राष्ट्रवादी चा पुढचा अध्यक्ष कोण होईल, याकडे आम्ही बघत नाही. कारण दुसऱ्यांच्या घरात आम्ही डोकावत नाही. ते ज्यांचे काम आहे, ते चोख बजावत आहे, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला हाणला.

Nana Patole and Sanjay Raut
Nana Patole यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल | Congress | Modi Sarkar | Sarkarnama

संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद केली पाहिजे, संजय राऊत आमचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवार म्हणजे त्यागाचे मूर्तिमंत रूप आहे. मल्लिकार्जुन खरगे मोठे नेते आहेत, त्यांचा या पद्धतीने अपमान होत असेल, तर आम्ही तो सहन करणार नाही, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

महाराष्ट्र (Maharashtra) पुरोगामी विचाराचा आहे, त्यामुळे महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्याच्या निर्णयासाठी पक्षातील कमेटी तयार झाली आहे ते निर्णय घेतील. शरद पवारांचा राजकारणातील अनुभव मोठा आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय राहावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, असेही पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com