Nana Patole on Pankaja Munde : पंकजा मुंडे लवकरच भाजपमध्ये स्फोट घडवणार; नानांचे भाकीत !

Pankaja Munde : नाराजीचा सूर लावत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली होती.
Nana Patole and Pnkaja Munde
Nana Patole and Pnkaja MundeSarkarnama

Gondia Political News : संवाद यात्रेची रूपरेषा आखण्यासाठी गोंदियात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्फोटक वक्तव्य केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे लवकरच भाजपमध्ये मोठा स्फोट घडवणार आहेत, असे ते म्हणाले. (Pankaja Munde had expressed his regret by setting a tone of displeasure)

काल (ता. १०) पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, गेली चार वर्षे मी धैर्य सांभाळून आहे. महाराष्ट्रात माझ्याकडे कोणतीही जबाबदारी नाही आणि मी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही गोष्टीत नाक खुपसत नाही, असा नाराजीचा सूर लावत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली होती. भाजपमध्ये काय चाललंय हे मला माहीत नाही. पण येणाऱ्या काही दिवसांत मात्र भाजपमध्ये मोठा स्फोट होणार आहे.

वादळापूर्वीची शांतता...

भाजपमध्ये (BJP) सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. दीड वर्षात मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हे महाराष्ट्राचे (Maharashtra) दुर्दैव आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊन आज दीड वर्ष झाले आहे. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. दरम्यान, नानांनी (Nana Patole) पुन्हा मोदी यांच्या भोपाळ येथील भाषणाची आठवण करून दिली.

भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सिंचन आणि विमान मंत्रालयामध्ये मोठा घोटाळा केला असून, जवळपास हा 70 हजार कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले होते. लगेचच त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटले आणि आठ दिवसांतच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

पालकमंत्री नसल्याने कामे खोळंबली...

आज एकूण १९ मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाहीत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. परंतु अशा ठिकाणी जाऊन कोणताही पालकमंत्री सामान्य जनतेचे प्रश्न सोडवीत असल्याचे दिसत नाही.

अनेक ठिकाणी नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. डेंग्यूसारख्या आजारांनी लोक मरत आहेत. परंतु अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. प्रशासकांच्या हाती कारभार असल्याने मनमर्जी सुरू आहे. ‘लुटो आणि बाटो’ असे हे सरकार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

Nana Patole and Pnkaja Munde
Nana Patole Jansanwad Yatra : 'ही' हुकूमशाही नाही तर दुसरं काय ? संसदेच्या उद्घाटनापासून शेतकऱ्यांपर्यंत.. पटोलेंनी सगळचं काढलं

मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या मोदींचा डाव...

केंद्र सरकारला लोकसभा अधिवेशनाची भीती वाटू लागली आहे. केंद्र सरकारने नवीन लोकसभा भवनात पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु या विशेष अधिवेशनाचा अजेंडा कोणत्याही खासदाराला कळवला नाही. या अधिवेशनात कदाचित भारताचे तुकडे होऊ शकतात किंवा येणाऱ्या दिवसांत स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ शकते, पण हे विदर्भाच्या भल्याकरिता नसून मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप नानांनी केला.

विदर्भ राज्य वेगळे करून मुंबईमधील अनेक उद्योग गुजरातमध्ये हालवण्याचा भाजपचा डाव आहे. दुसरीकडे येणाऱ्या दिवसांत लोकसभेच्या बसण्याच्या आसनावरून लोकसभेच्या जागाही भविष्यात वाढू शकतात, असे भाकीत नानांनी केले आहे. त्यामुळे पाच दिवसांत विशेष अधिवेशनात काय होते, त्यावर सामान्य जनतेला विश्‍लेषण करावे लागणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com