Nana Patole म्हणाले, सत्यजीत तांबेंच्या तोडीस तोड उमेदवार देऊ, सोमवारी कळेलच...

Sanjay Raut : नाना पटोले यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना चिमटा काढला आहे.
Nana Patole and Satyajeet Tambe
Nana Patole and Satyajeet TambeSarkarnama

Nashik Graduate Constituency News : संजय राऊत दिल्लीला राहतात, त्यांना फार गोष्टी माहिती नसतात, असे वक्तव्य करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना चिमटा काढला आहे. फडणवीसांनी सत्यजीत तांबेंबाबत अगोदरच एका कार्यक्रमात संकेत दिले होते, तेव्हा कॉंग्रेसला जाग आली नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते.

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) त्या वक्तव्याचा आज भंडारा (Bhandara) येथे नानांनी चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत दिल्लीला राहतात त्यांना फार गोष्टी माहिती नसतात. राऊत जे बोलले, ते कदाचित अनवधानाने बोलले असतील. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. आम्ही सत्यजीत तांबे यांच्या तोडीस तोड उमेदवार देऊ. येत्या सोमवारी १६ जानेवारीला ते कळेलच असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे.

नाना पटोले आज कितीही दावे करीत असले तरी. शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत कुठेतरी बिघाडी झाल्याचे दिसत आहे. कोण कोणाला विरोध करतोय, हा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा नाही, तर लोकांचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंह पुण्यात येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना विरोध होणे अपेक्षित होते. पण तसे होताना दिसत नाही. याबाबत पटोले म्हणाले, यापेक्षाही महत्वाचे जनतेचे प्रश्‍न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे. ही सूचना प्रसार माध्यमांसाठीही आहे.

कुणी कसे कपडे घातले, किती कमी घातले, यावर प्रसार माध्यमांवर बातम्यांची भरमार बघायला मिळते. मागे ते जडीबुटीवाले बाबा म्हणाले होते की, महिला साडीवर चांगली दिसते, सलवारवरही चांगली दिसते अन् बिना कपड्यांचीही चांगली दिसते. अशा पद्धतीने जडीबुटी बाबाने म्हटल्यानंतरही त्याच्यावर कुठलीही कारवाई करायची नाही आणि माध्यमांच्या माध्यमातून वादंग निर्माण करायचा. हे सर्व कशासाठी तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हे सर्व प्रकार जाणून घडवून आणले जात आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com