Nagpur Politics : राज्यातील सरकार लुटारू आणि डाकू आहे. यांना सत्तेची गर्मी आहे. त्याचाच प्रत्यय सातत्याने येत आहे. सदा सरवणकर प्रकरण काय होते? राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे. पेालिस अधिकारी आणि कर्मचारी दबावात आहेत. अधिकाऱ्यांनी आमदारांचे ऐकले नाही, तर राज्यातील अधिकाऱ्यांची बदली करून आणली जात आहे. मिरा भायंदरमध्ये मुस्लिमांची घरे सरकारने जाणीवपूर्वक पाडली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.
गणपत गायकवाड यांच्या प्रकरणात भाजप काय करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सरकाला कायद्याचे राज्य नको आहे. त्यामुळे सरकारने तातडीने राजीनामा द्यावा, घरी बसावे. महायुतीच्या सरकारमध्ये गुंडशाही आहे. जनतेचे पैसे सरकार लुटत आहे. हे डाकू लोक आहेत. सरकारची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दहशत असल्याची टीकाही पटोले यांनी केली.
पुण्यात नाटक सुरू असताना ते बघण्यासाठी बसलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आला. या नाटकात देवाला सिगारेट ओढताना दाखविले आहे. एनएसयूआयच्या लोकांनीही नाटकाचा विरोध केला. तरी पोलिसांकडून एनएसयूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला लावण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्याबाबत बोलताना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना स्त्रियांबद्दल सन्मान नाही. यांची वृत्ती तशीच आहे. श्रीराम म्हणणारे आम्ही असल्याचे हे लोक सांगतात. भाजप कधीच सीताराम म्हणत नाही. त्यामुळे ते महिलांचा सन्मान करूच शकत नाहीत, असे त्यांनी नमूदक केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आपण त्या बैठकीत होतो. प्रकाश आंबेडकर हे राज्याबद्दल बोलले. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करायचा आहे, असे ठाम मत पटोले यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. महायुतीत काय सुरू आहे हे सर्वांनाच माहिती आहे. गणपत गायकवाड प्रकरणातून सगळे काही लक्षात येईल, असेही पटोले म्हणाले.
छगन भुजबळ यांनी भाजपमध्ये जावे किंवा कुठेही जावे. आपण त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे पटोले यांनी सांगितले. मराठा समाजाबाबत आणि ओबीसींबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आधीही अशीच भूमिका घेतली होती. आताही तिच भूमिका घेत आहोत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाची भूमिका ही जातनिहाय जनगणनेची आहे. असेही पटोले म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.