नाना म्हणतात, चर्चा आणि आरोप हे यशस्वी व्यक्तीच्या सोबत नेहमी असतातच !

कारण कुणालाही जेलमध्ये जायचे नाही. पगार मिळतो, तेवढे काम करावे, अशी मानसिकता अधिकाऱ्यांची झाली आहे, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : आरोप प्रत्यारोपाचं काम नाना पटोले करीत नाही. म्हणून मी न्यायालयाचा (Court) दरवाजा ठोठावणार आहे. आमच्या लिगल सेलचे लोक त्याचा तपास करीत आहे. हे पसरवणारी व्यक्ती कोण आहे, हे मला माहिती नाही. ते जेव्हा तपासतील त्यानंतर `त्या’ फोटोमध्ये माझ्या बाजुला बसलेली व्यक्ती कोण आहे, हे पुढे येणार आहे, असे नाना पटोले म्हणाले. सध्या त्यांच्याबाबत एक पोस्ट भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chirta Wagh) यांनी पुढे आणली आहे. त्यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

माझं चरित्र हनन करण्याचे प्रयत्न कुणीतरी करीत आहे. चर्चा आणि आरोप हे यशस्वी व्यक्तीच्या मागे नेहमी लागलेलेच असतात. मागेही पेगॅससच्या माध्यमातून माझे फोन टॅपिंग झाले आहे. त्यात माझे नाव अमजद खान ठेवले गेले होते. त्यालाही आता मोठा काळ लोटून गेला. मी त्या लाइनचा असतो, तर आतापर्यंत काहीतरी भानगड पुढे आलीच असती. आज महाराष्ट्राची (Maharashtra) अवस्था आपण बघितली, तर प्रशासन ठप्प पडलेलं आहे. कोणताही अधिकारी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही. कारण कुणालाही जेलमध्ये जायचे नाही. पगार मिळतो, तेवढे काम करावे, अशी मानसिकता अधिकाऱ्यांची झाली आहे, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.

चोरून बनवावे लागले सरकार..

२०१४ ते २०१९ राज्यात सत्ता असल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले. पण तरीही त्यांना सरकार बनवता आले नाही. मग पहाटे चोरून त्यांना सरकार बनवावे लागले. त्यानंतर ७४ तासामध्ये सरकार पडलं. त्यानंतर मग महाविकास आघाडीचे सरकार आले. आधी कोरोनाचा काळ गेल्यानंतर सरकार चांगलं काम करत असताना. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून तेही सरकार पाडण्यात आलं. हे दबावतंत्राचं राजकारण पुरोगामी महाराष्ट्रासाठी न परवडणारं असल्याचंही नाना म्हणाले.

Nana Patole
चेरापुंजीतील ‘तो’ कथित व्हिडिओ व्हायरल; नाना पटोले-चित्रा वाघ यांच्यात जुंपली

विधानसभा अध्यक्ष काय करू शकतो, हे दाखवले..

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असता मंत्रिपद पाहिजे किंवा अध्यक्षपद पाहिजे, असे माझं काहीही नव्हतं. पण एके सकाळी मला राहुल गांधी यांचा कॉल आला आणि तुम्हाला विधानसभेचे अध्यक्ष व्हायचे आहे, असं ते म्हणाले. त्यांचा आदेश मानून मी अध्यक्ष बनलो. त्यातही फक्त ‘होयचे बहुमत, नाहीचे बहुमत’, येवढीच भूमिका ठेवली नाही. तर लोकहिताचे ठरावही अध्यक्ष या नात्याने मी आणले. एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा हायकमांडचा आदेश आला की विधानसभेचे अध्यक्षपद सोडा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करा आणि मी आदेश मानला, असे नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com