नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर, २ जेसीबी व एक ग्रेडर वाहन जाळले...

दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान ४० ते ५० च्या संख्येने नक्षलवादी येथे आले. १० ते १५ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी पुढे येऊन वाहनांना आग लावली. (Gadchiroli)
Naxal, Gadchiroli
Naxal, GadchiroliSarkarnama
Published on
Updated on

भामरागड (जि. गडचिरोली) : भामरागड या तालुका मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावरील इरपनार गावात आज नक्षलवाद्यांनी (Naxal) १५ ट्रॅक्टर, दोन जेसीबी व एक ग्रेडर वाहन, अशी एकूण १८ वाहने जाळली. प्रधानमंत्री (Prime Minister) ग्राम सडक योजनेअंतर्गत धोडराज ते इरपनार या ४ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर जवळपास २२ ते २५ वाहने होती.

काही वाहने कंत्राटदाराची होती, तर काही परिसरातील स्थानिक नागरिकांच्या काही वाहनांचा यात समावेश होता. गावालगत खड्डा खोदून माती काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान ४० ते ५० च्या संख्येने नक्षलवादी येथे आले. १० ते १५ बंदूकधारी नक्षलवाद्यांनी पुढे येऊन वाहनांना आग लावली. तसेच लाल रंगाचे बॅनर बांधून निघून गेले. सुरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचारांचा प्रसार करा, अशा आशयाचे बॅनर वाहने जाळल्याच्या ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते.

राज्य सरकारच्या दमनकारी नीतीचा बहिष्कार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भामरागड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत विसामुंडी गावाजवळ वनविभागातील दोन वनरक्षकांना गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना १२ जानेवारीला घडली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

Naxal, Gadchiroli
तीन राज्य मिळून केली नक्षल्यांनी नवीन झोनची स्थापना; नक्षल संघटनेच्या बळकटीकणाचा प्रयत्न

या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना नक्षल्यांचा विरोध स्पष्टपणे पुढे आलाय. रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ करण्यात आली. भामरागड तालुक्यातील इरपनार गावाजवळ दुपारी ही घटना घडली. ह्या भागातील धोडराज- इरपनार- नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्ता निर्मितीचे काम सुरू होते. या कामावर यंत्रसामग्री कार्यरत असताना नक्षल्यांनी काम थांबवून वाहनांची जाळपोळ केली. अतिदुर्गम भागात विकासकामांना नक्षल्यांचा विरोध आजही होतच आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत नक्षल शोधमोहीम वेगवान केली आहे. जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूक आणि मतमोजणी पूर्ण होऊन 24 तास होत नाही, तोच नक्षली सक्रिय झाले. त्यामुळे पुढील काळात पोलिस विभागाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com