NCP Ajit Pawar News : अजित पवार गट म्हणतो राष्ट्रवादी आमचीच, कुंपणावरील कार्यकर्तेही आमच्याकडेच येणार !

Prashant Pawar : पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
Ajit Pawar and Prashant Pawar
Ajit Pawar and Prashant PawarSarkarnama

Nagpur Political News : सध्या राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भात मात्र राष्ट्रवादी आमचीच हे दाखवून देण्यासाठी अजित पवार गटाच्यावतीने शनिवारी (ता.२) शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. देशपांडे सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्याला नागपूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. (It is claimed that five thousand activists will be present)

उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर नागपूर जिल्ह्याची सूत्रे बाबा गुजर आणि आता शहराची सूत्रे प्रशांत पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गुजर ग्रामीणचे तर पवार यांना शहराचे अध्यक्ष करण्यात आले आहे. दोन्ही नवनियुक्त आध्यक्षांच्यावतीने पहिला मेळावा शनिवारी (ता. २ सप्टेंबर) घेण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही या मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र मुंबईत इंडियाची बैठक असल्याने दोन्ही नेते सध्या मुंबईच्या (Mumbai) बाहेर पडण्याची शक्यता नाही.

असे असले तरी या मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात ‘राष्ट्रवादी आपलीच’, असे संदेश पोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता शहरभर मेळाव्याचे फलक लावण्यात येणार आहेत. पाच हजार कार्यकर्त्यांच्या बसण्याची व्यवस्था देशपांडे सहभागृहासोबतच बाहेर प्रांगणात करण्यात येणार आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि अनेक वर्षे विदर्भाचे मंत्री असतानाही झाली नाही तेवढी भव्य सभा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.

Ajit Pawar and Prashant Pawar
Sharad Pawar जेव्हा एका वाक्यात विषय एन्ड करतात | Ajit Pawar

हा मेळावा एकप्रकारे शक्ती प्रदर्शन असून शरद पवार यांच्या सोबत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही अप्रत्यक्षपणे थेट सोबत येण्याचे निमंत्रण या माध्यमातून दिले जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि त्यानंतर उर्वरित जिल्हे, असे पाठोपाठ मेळावे घेऊन संपूर्ण विदर्भ ढवळून काढला जाणार आहे.

गोंदिया येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह आपल्यालाच भेटणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार गटात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे कुंपणावर असलेले कार्यकर्त्यांचेही अजित पवार गटात सहभागी होऊ लागले आहेत. नागपूरमध्ये होणारा मेळावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रमेश बंग यांना इशारा असल्याचे मानले जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com