Amravati-Municipal-Corporation
Amravati-Municipal-CorporationSarkarnama

Standing Committee : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, स्थायी समिती सभापतीपदी मार्डीकर

Amravati NCP Avinash Mardikar : अविनाश मार्डिकर स्थायी समितीचे 31 सभापती बनले आहेत. मावळत्या पंचवार्षिकमध्येही ते या पदावर होते.
Published on

NCP News : अमरावती महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आल्या आहेत. गटनेते अविनाश मार्डीकर हे स्थायी समितीचे सभापतीपदी निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांचा पराभव केला. विरोधी पक्षापैकी एमआयएमने यावेळीही तटस्थेतेची भूमिका घेतली.

चार वर्षानंतर झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या पहिल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादीला या पदासाठी संधी देण्यात आली.

राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर व काँग्रेसकडून प्रशांत महल्ले यांनी नामांकन दाखल केले होते. पाठासीन अधिकारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. सोळा सदस्यांपैकी अकरा सदस्यांनी मार्डीकर यांच्या बाजूने तर तीन सदस्यांनी प्रशांत महल्ले यांना मतदान केले. आठ मतांनी अविनाश मार्डिकर यांचा विजय झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी घोषित केले.

मार्डिकर स्थायी समितीचे एकतीसावे सभापती बनले आहेत. मावळत्या पंचवार्षिकमध्येही ते या पदावर होते. विद्यमान स्थायी समितीत सोळा सदस्य असून अकरा सदस्य महायुतीचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार हे आधीच स्पष्ट होते. मात्र बिनविरोध निवड होऊ नये यासाठी काँग्रेसने तीन सदस्यांच्या जोरावर उमेदवार रिंगणात आणला. एमआयएमने मात्र नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेतली. या पक्षाचे दोन सदस्य स्थायी समितीत आहेत.

Amravati-Municipal-Corporation
Maval APMC News: मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत नेतृत्व बदलणार; सभापती, उपसभापती यांचे राजीनामे

पिठासिन अधिकारी आशिष येरेकर व महापालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमिद शेख वाहेद, पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका यांनी स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डिकर यांचे पुष्‍पगुच्‍छ देवुन स्वागत केले.

Amravati-Municipal-Corporation
Gokul Dudh Sangh Election: गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटलांना धक्का; 'हा' बडा नेता लागला मुश्रीफांच्या गळाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com